Dhananjay Munde's Announcement: कृषिमंत्री धनंजय मुंडेंची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; पीकविम्यापासून एकही...

Payment Of Crop Insurance: उर्वरित शेतकरी बांधवांनी आपला विमा अर्ज ३ ऑगस्टच्या आत ऑनलाइन पद्धतीने भरून घ्यावा.
Dhananjay Munde
Dhananjay Munde sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज (ता. ३१ जुलै) मोठी घोषणा केली आहे. खरीप हंगामातील पीकविमा भरण्याची मुदत आज संपणार होती. मात्र, राज्यातील एकही शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहू नये, यासाठी विमा अर्ज भरण्याची मुदत तीन ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री मुंडे यांनी दिली आहे.

कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या घोषणेत म्हटले आहे की, या खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत दीड कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पीकविमा अर्ज भरले आहेत.

Dhananjay Munde
Governor Appointed MLA: राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसंदर्भात हायकोर्टाचा राज्य सरकारला महत्वपूर्ण आदेश...

तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा पीकविमा (crop insurance) भरणे मागे राहू नये, यासाठी ऑनलाइन विमा अर्ज करण्यासाठी तीन दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. उर्वरित शेतकरी बांधवांनी आपला विमा अर्ज ३ ऑगस्टच्या आत ऑनलाइन पद्धतीने भरून घ्यावा, असे आवाहन मुंडे यांनी केले आहे.

दरम्यान, अधिवेशनात काळात अनेक आमदारांनी पीकविमा भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी केली हेाती. त्याचवेळी विधानसभेत उत्तर देताना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी अर्ज भरण्याच्या मुदतवाढीचे संकेत दिले होते.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही आज पीकविमा भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी केली हेाती. पीक विमा भरण्याची आज अंतिम मुदत आहे. पण ऑनलाईन फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता राज्यातील अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे आपल्यासोबत झालेल्या चर्चेनुसार आपण पीक विमा योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली हेाती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com