Munde First Reaction on pawar Sabha : पवारांच्या बीडमधील सभेनंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘भक्ताच्या मनातील देव काही...’

Dhananjay Munde News : अब्दुल सत्तार यांच्या महोत्सवाला ५७ लाख देण्याचा निर्णय मुंडे अधिकाऱ्यांवर ढकलून मोकळे झाले.
Dhananjay Munde-Sharad Pawar
Dhananjay Munde-Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Yavatmal : ज्येष्ठ नेते शरद पवार हे आमचे दैवत आहेत. देवाने त्यांच्या मनातून भक्ताला काढलं, तरी भक्ताच्या मनातील देव काही निघत नाही, अशा शब्दांत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पवारांच्या बीडमधील सभेवर व फोटो न लावण्याच्या तंबीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. (Dhananjay Munde's first reaction after Sharad Pawar's Sabha in Beed)

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी (ता. १७ ऑगस्ट) बीडमध्ये सभा झाली. त्या सभेत नाव न घेता पवार यांनी धनंजय मुंडे यांना इशारा दिल्याची चर्चा राज्यात रंगली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी यवतमाळमध्ये आलेल्या मुंडेंनी बीडच्या राष्ट्रवादीच्या सभेबाबत भाष्य केले.

Dhananjay Munde-Sharad Pawar
Girish Mahajan Statement : सर्वच पक्षांचे बारा वाजलेत, आता आपण काहीही करू शकतो; गिरीश महाजनांचे वक्तव्य

धनंजय मुंडे म्हणाले की, बीडच्या सभेबाबत मला काही बोलायचं नाही. पण, माझा फोटो वापरू नका, असे शरद पवारांनी सांगितल्याचे तुमच्या माध्यमातूनच कळतं. शेवटी ते आमचं दैवत आहे. त्यामुळे आमच्या मनातील देव काही केल्या जाणार नाही, असेही स्पष्ट केले.

ज्यांच्याविरोधात लढले, त्यांच्याच सोबत जाऊन बसले, अशीही टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांवर झाली. त्यावर कृषिमंत्री मुंडे यांनी ‘आम्ही त्यांचंच सगळं अनुकरण करतोय,’ असे सांगितले.

Dhananjay Munde-Sharad Pawar
Beed Politics : शरद पवारांवरील निष्ठेपायी संदीप क्षीरसागरांनी तिसऱ्यांदा सोडली सत्तेची संधी....

अब्दुल सत्तार यांच्या कृषी महोत्सवासंदर्भातील ५७ लाख रुपयांची देयके देणे बाकी होते. ती देताना कृषिमंत्र्याला विचारलं जात नाही. हा निर्णय खालच्या पातळीवर अधिकाऱ्यांनी घेतला आहे आणि ती देयके दिली आहेत, असे सांगून मुंडे सत्तार यांच्या महोत्सवाला ५७ लाख देण्याचा निर्णय अधिकाऱ्यांवर ढकलून मोकळे झाले.

मुंडे म्हणाले की, शेतकऱ्यांसमोर असंख्य संकटं आहेत. शेतकऱ्यांच्या व्यवसाय आभाळाखाली आहे. त्यामुळे निसर्गाचं प्रत्येक संकट शेतकऱ्यांना अडचणीत आणतं. शेतकऱ्यांना पूर, दुष्काळ यासारख्या प्रत्येक संकटाशी सामोरे जावे लागते. अशा संकटाच्या काळात अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाय योजना कराव्या लागतील. शाश्वत शेतीचा आधार शेतकऱ्यांना द्यावा लागेल. जे आम्ही द्यायचा प्रयत्न करतो आहेात, म्हणूनच आमच्या सरकारने एक रुपयात पीकविमा ही योजना आणली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशातील १५०० कोटी वाचले आहेत.

Dhananjay Munde-Sharad Pawar
Maharashtra Cabinet Decision : मुख्यमंत्र्यांकडून योगेश कदम, सुनील तटकरेंना मोठी भेट; गौरी-गणपतीला मिळणार आनंदाचा शिधा

शेतकरी कृषी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी योजना आणली आहे, त्यातून राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत. नैसर्गिक संकट आल्यानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तरतुदीनुसार आम्ही शेतकऱ्यांना मदत करत आहोत, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com