Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama

Bachchu Kadu News : माजी मंत्री बच्चू कडूंना धाराशिव न्यायालयाने सुनावली अनोखी शिक्षा

धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये २०१५ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात अखर्चिक निधीवरून प्रहार संघटनेकडून आंदोलन केले होते.

धाराशिव : धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाने (Court) माजी मंत्री आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना ‘कामकाज संपेपर्यंत थांबण्याचे सांगत अडीच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच पुढील काळात चांगले वर्तन केले जाईल, असे शपथपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. (Dharashiv court imposed a fine of 2500 on former minister MLA Bacchu Kadu)

धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये २०१५ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात अखर्चिक निधीवरून प्रहार संघटनेकडून आंदोलन केले होते. त्यात दोषी ठरवून आमदार बच्चू कडू यांना धाराशिव न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

Bacchu Kadu
Dharashiv News : राष्ट्रवादी नेत्याच्या एका फोनमुळे शिंदे गटाला मिळाली अर्धी सत्ता

याबाबत सविस्तर वृत्त असे की, धाराशिव जिल्हा परिषदेतील दिव्यांग विभागासाठी आरक्षित असलेला निधी खर्च करण्यात आलेला नव्हता. तो तसाच पडूनराहिला होता. यावरून २ नोव्हेंबर २०१५ मध्ये आमदार असलेल्या बच्चू कडू यांनी जिल्हा परिषदेचे तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आंदोलन केले होते.

त्या आंदोलन प्रकरणी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, बलराज रणदिवे, बाळासाहेब कसबे, चंद्रकांत जाधव यांच्यासह पाच संशयित आरोपी होते. या सर्वांना न्यालयाने निर्दोषमुक्त केले आहे. दरम्यान याच आंदोलन प्रकरणी आमदार कडू यांना ५०६ कलमाअंतर्गत दोषी ठरविण्यात आले होते.

Bacchu Kadu
Marathwada News : उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांनी प्रतिष्ठेच्या निवडणुकीत विजय खेचून आणला : मराठवाड्यात पुन्हा गड राखला

धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी त्या खटल्याचा आज निकाल दिला आहे. मुख्य फिर्यादी पोलिस कॉन्स्टेबल सतीश घंटे, डीवायएसपी हिरे, तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांची साक्ष महत्वाची ठरल्याची माहिती शासकीय अभियोक्ता ॲड. महेंद्र देशमुख यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com