Dindori Lok Sabha Exit Poll 2024 : दिंडोरीत राष्ट्रवादीचा वनवास 20 वर्षांनी संपणार?

Bhaskar Bhagare Will be defeated BJP Bharti Pawar : 2009 मध्ये पुनर्रचनेत दिंडोरी मतदारसंघ तयार झाला. या मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Bhaskar Bhagre News: लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. यामध्ये पाॅलस्ट्राट या संस्थेने दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) उमेदवार भास्कर भगरे आघाडीवर असल्याचे म्हटले आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार राज्यमंत्री डॉ भारती पवार उमेदवार आहेत. त्यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांची चुरशीची लढत आहे.

हा मतदारसंघ पूर्वाश्रमीचा मालेगाव मतदार संघ आहे. 2009 मध्ये पुनर्रचनेत दिंडोरी मतदारसंघ तयार झाला. या मतदारसंघात शरद पवार Sharad Pawar यांना मानणारा मोठा वर्ग आहे. येथील बहुतांशी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे असतात.

या मतदारसंघाचे वर्णन बारामती नंतर राष्ट्रवादी काँग्रेससाठी NCP सर्वात सुरक्षित मतदारसंघ असे केले जाते होते. खुद्द शरद पवार यांनी तसे विधान केले होते. प्रत्यक्षात मात्र गेल्या वीस वर्षांत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पराभूत झाली आहे. भारतीय जनता पक्षाने हा मतदार संघ आपल्याकडे ठेवला आहे.

या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे हरिश्चंद्र चव्हाण 2004 मध्ये 2 लाख 18 हजार 259, 2009 मध्ये 2 लाख 81 हजार 254 आणि 2014 मध्ये 5 लाख ४२ हजार ७८४ मते मिळवत सलग तीन वेळा विजयी झाले आहेत. २०१९ मध्ये याच पक्षाच्या डॉ. भारती पवार 5 लाख 67 हजार 470 मते मिळवून विजयी झाल्या आहेत. प्रत्येक वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार पराभूत झाला.

Sharad Pawar
Minister Chandrakant Patil : मंत्री पाटलांना 'भलताच' कॉन्फिडन्स; सोलापूर, माढ्यात सुप्त लाटेचा करिष्मा दिसणार?

यंदाही दिंडोरी मतदार संघात सहापैकी नितीन पवार (कळवण), दिलीप बनकर (निफाड), मंत्री छगन भुजबळ (येवला), नरहरी झिरवाळ (दिंडोरी) एक चार आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. ते सध्या अजित पवार गटात आहेत. विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि लोकसभेला भाजप असे येथील समीकरण राहिले आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही आघाडी मिळालेली नाही. सातत्याने भाजपचा उमेदवार येथून विजयी झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी बारामती नंतरचा सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ मानला गेलेल्या दिंडोरी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वनवास 20 वर्षांनंतर संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथे या पक्षाचे भास्कर भगरे आघाडीवर राहतील, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे.

(Edited By Roshan More)

Sharad Pawar
Narendra Modi : "मोदींसारख्या तपस्वी, ध्यानस्थ अन् ध्यानमग्न माणसाला 800 जागा मिळाल्या पाहिजेत"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com