Uddhav Thackeray, Eknath Shinde News : आंबेडकर-ठाकरेंची चर्चाच; शिंदेंनी टायमिंग साधले!

Uddhav Thackeray, Eknath Shinde News : जोगेंद्र कवाडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युतीची घोषणा केली.
Prakash Ambedkar, Uddhav Thackeray, Eknath Shinde, Jogendra Kawade
Prakash Ambedkar, Uddhav Thackeray, Eknath Shinde, Jogendra KawadeSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray, Eknath Shinde News : जोगेंद्र कवाडे यांच्या पिपल्स रिपब्लिकन पार्टी आणि एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षांची आघाडीची घोषणा केली. त्यामुळे राज्यातील बहुचर्चीत वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युतीची अजून चर्चाच सुरु आहे. त्यामध्ये शिंदे आणि कवाडे यांनी टायमिंग साधत आघाडी घेतली आहे.

जोगेंद्र कवाडे (Jogendra Kawade) आणि एकनाथ शिंदे यांनी आज (ता. 4) मुंबईमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेत आघाडीची घोषणा केली. यामुळे आंबेडकर आणि ठाकरे यांच्या आधी शिंदे यांनी युतीची घोषणा करत आघाडी घेतली आहे. त्यामुळे वंचित आणि शिवसेनेच्या (Shivsena) आघाडीवर शिंदे यांनी पर्याय शोधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Prakash Ambedkar, Uddhav Thackeray, Eknath Shinde, Jogendra Kawade
Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदेची उद्धव ठाकरेंवर कुरघोडी? जोगेंद्र कवाडेंच्या गटाबरोबर युतीची घोषणा

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या अनेक बैठका झाल्या आहेत. आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. मात्र, जागा वाटपावरुन दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे. त्यामध्ये शिंदे यांनी घाडीची घोषणा करुन टाकली. यामुळे शिंदे यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर कुरघोडी केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

मुंबई महापालिकेसाठी शिवसेना, भाजप, शिंदे गट यांची जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे एकमेकांना शह कटशह देण्यासाठी तीनही पक्षांकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे शिवसेना ही वंचित बहुजन आघाडीशी युतीची चर्चा करत आहे. तर भाजप आणि शिंदे गटाच्या युतीमध्ये कवाडे यांचा समावेश करुन बेरजेचे राजकारण केले आहे.

दरम्यान, आघाडीची घोषणा केली त्यावेळी कवाडे म्हणाले, मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाडसी मुख्यमंत्री आहेत. तसेच ते तळागळातून व संघर्ष करत पुढे आलेले नेतृत्व आहे. राज्यात अनेक ठिकाणी फिरलो. त्यावेळी राज्यातील लोकांमध्ये काही महिन्यांपूर्वी सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार सर्व सामान्यांचे सरकार असल्याची भावना पाहायला मिळाली.

Prakash Ambedkar, Uddhav Thackeray, Eknath Shinde, Jogendra Kawade
Bawankule : सभा फ्लाॅप तरी भाजप फाॅर्मात, औरंगाबादची जागा दोन लाखांनी जिंकण्याचा दावा..

त्यामुळे जर आघाडी करायचीच असेल तर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशीच करायची असे मत आमच्या पक्षाकडून व्यक्त करण्यात आले. महाराष्ट्राच्या विकासाच्या राजकारणाला गतिमान करताना सर्वांच्या हक्क, प्रगती, विकासासाठी शिंदेंचा पक्ष कटीबध्द आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष निवडणुकीत एकत्रितपणे लढणार, असल्याचे त्यांनी जाहिर केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com