Fadnavis's Dream Project : फडणवीसांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ पुन्हा सुरू होणार; मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव बुद्रूक येथील शिवसृष्टीला ५० कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे.
Jalyukta Shivar Yojana
Jalyukta Shivar YojanaSarkarnama

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेली जलयुक्त शिवार योजना (Jalyukta Shivar Yojana) पुन्हा सुरू होणार आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात या योजनेला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, पुन्हा सत्तेवर येताच फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना २.० या नावाने ती पुन्हा सुरू केली आहे. (Fadnavis's dream project Jalyukta Shivar Yojana will be started)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. १३ डिसेंबर) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना सुरू करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू केली होती. मात्र, मध्यंतरी सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजनेला स्थगिती देण्यात आली होती. तसेच, कॅगच्या अहवालात योजनेवर ताशेरे ओढण्यात आले होते. त्यामुळे ही योजना वादात अडकली हेाती. या योजनेवरून फडणवीस यांच्यावरही आरोप झाले होते.

Jalyukta Shivar Yojana
Mohite Patil : विजयदादा भाजपत असेपर्यंत त्यांचा लक्ष्मण म्हणून काम करेन : सुभाष पाटलांनी गायले मोहिते पाटलांचे गोडवे

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत ही योजना सुरू करण्यावर एकमत झाले. त्यानंतर जलयुक्त शिवार योजनेसह १५ निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव बुद्रूक येथील शिवसृष्टीला ५० कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार जागांची भरती प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे.

Jalyukta Shivar Yojana
Solapur News : मोहिते पाटलांच्या कट्टर विरोधकाचा विजयदादांच्या उपस्थितीतच भाजपत प्रवेश

मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीतील निर्णय

  • जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय. राज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होणार.

  • (मृद व जलसंधारण विभाग)

  • जळगांव जिल्ह्यातील कुऱ्हा-वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेला गती देणार. २२२६ कोटी सुधारित खर्चास मान्यता.

  • (जलसंपदा विभाग)

  • आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील १५८५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करणार

  • खेड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मनरेगा आणि इतर विविध विभागांची सांगड

  • राज्यातील ग्रामीण भागात सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविणार.

  • गगनबावडा आणि जत तालुक्यात मौजे संख येथे होणार ग्राम न्यायालय

  • शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणारी सलोखा योजना. नाममात्र नोंदणी व मुद्रांक शुल्क आकारणारा

  • राज्यात काजू फळपिक विकास योजना लागू होणार. कोकणातील शेतकऱ्यांना होणार फायदा

  • शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदानात ६० टक्के वाढ. वाचनसंस्कृतीला मिळणार बळ

  • कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करणार. कालबाह्य तरतुदी काढणार. कारावासाऐवजी वाढीव दंडाची तरतूद

  • १३ सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकहमीपोटी शासनाने बँकेस देय असलेली रक्कम अदा करणार.

  • पुणे जिल्ह्यातील आंबेगांव बु. येथील शिवसृष्टी प्रकल्पास ५० कोटी अनुदान देणार.

  • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांची भरती प्रक्रियेला गती देणार

  • पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि युनिव्हर्सल एआय विद्यापीठ, कर्जत या स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठांना मान्यता

  • महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र सिनेमा अधिनियमात शिक्षेच्या सुधारित तरतुदी. ईज ऑफ डुईंग बिझिनेसाठी निर्गुन्हेगारीकरण करणार

  • राज्यातील शाळांना अनुदान. ११०० कोटींना मान्यता

  • महाअधिवक्ता श्री आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा स्वीकृत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com