10th October in History : दिल्ली 'फायरब्रँड' व्यक्तिमत्वाच्या हाती सोपविण्याचा निर्णय

Dinvishesh News : वर्मा यांना हटविण्यासाठी भाजपच्या नेतृत्त्वावर तत्कालिन नेते, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराणा, केदारनाथ साहनी, खासदार ओ. पी. कोहली हे वजनदार नेते वर्मा यांना हटविण्याची मागणी करत होते.
Dinvishesh 9 October
Dinvishesh 9 OctoberSarkarnama
Published on
Updated on

1998 मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या. त्यावेळी दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे सरकार होते. मुख्यमंत्री होते साहिबसिंग वर्मा. भारतीय जनता पक्षाने त्यावेळी तातडीने वर्मा यांना हटविण्याचा निर्णय घेतला.

भाजपच्या गोटात त्यावेळी भरपूर विचार विनिमय सुरु होत्या. साहिबसिंग वर्मा यांच्या काळात दिल्लीत निर्माण झालेल्या समस्या, ढासळती कायदा सुव्यवस्था, वीज टंचाई, आरोग्याच्या समस्या अशा अनेक गोष्टींशी दिल्लीकर लढत होते. त्यामुळे वर्मा यांना हटविण्यासाठी भाजपच्या नेतृत्त्वावर तत्कालिन नेते, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराणा, केदारनाथ साहनी, खासदार ओ. पी. कोहली हे वजनदार नेते वर्मा यांना हटविण्याची मागणी करत होते.

वर्मांना मुख्यमंत्री पदावरून दूर करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही दबाव येत होता. वर्मा यांच्या ऐवजी खुराणा यांना नेमावे, असे मत भाजपच्या एका गटाकडून व्यक्त केले जात होते. मात्र, उंबरठ्यावर आलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही जबाबदारी घेण्याची खुराणा यांची तयारी नव्हती.

अखेर नांव समोर आले ते फायरब्रँड नेत्या सुषमा स्वराज यांचं. दिल्लीतली त्यांची वाढती लोकप्रियता, उत्तम वक्त्या म्हणून मिळवलेली ख्याती आणि मुख्य म्हणजे महिलांच्या मतांवर डोळा ठेऊन स्वराज यांची मुख्यमंत्री पदी निवड करण्याचा निर्णय झाला. वर्मा यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. हे घडले आजच्याच दिवशी 10 ऑक्टोबर 1999 रोजी......

वर्मा हे जाट समाजाचे. त्यांना हटविल्यास जाट समाजाची मते दुरावतील ही भीती भाजपला वाटत होती. सुषमा स्वराज मुळच्या हरियाणाच्या. आणि त्यातही जाट समाजाच्या. त्यामुळे भाजपला स्वराज यांची निवड स्वार्थाने योग्य वाटली नसती तरच नवल.....

दिनविशेष - 10- ऑक्‍टोबर

राष्ट्रीय टपाल दिन, जागतिक मानसिक आरोग्य दिन, जागतिक मृत्यू दंड विरोधी दि

Dinvishesh 9 October
9th October in History - बसपाच्या संस्थापकांचे निधन आणि उत्तर कोरियाची अणूचाचणी

1899 - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात ते अग्रणी नेते होते. गोवा मुक्ती समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. त्यांना त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त "ऑर्डर ऑफ लेनिन' हा तत्कालीन सोव्हिएत संघराज्याचा सन्मान प्रदान करण्यात आला.

1913 - जगप्रसिद्ध पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण

1954 - आचार्य अत्रे यांच्या "श्‍यामची आई' या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक. चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देण्याला या वर्षापासून सुरवात झाली.

1970 - ब्रिटनने फिजीला स्वातंत्र्य दिले.

1980 - उत्तर अल्जेरियात भूकंपाने अडीच हजारांहून अधिक जणांचा मृत्यू

1986 - सॅन साल्वाडोरमध्ये भूकंप. १५०० जणांचा मृत्यू

1997 - पुण्याचे माजी महापौर व शहर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव जगन्नाथराव भोसले यांचे निधन.

2000 - जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आणि श्रीलंकेच्या वयोवृद्ध नेत्या सिरीमाओ भंडारनायके यांचे निधन.

2001 - समाजवादी विचारांचे ज्येष्ठ नेते व उदयगिरी महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. नारायण यज्ञदेव ऊर्फ ना. य. डोळे यांचे निधन.

Dinvishesh 9 October
Mahayuti Politics : भाजपसाठी 'बूस्टर', 'बार्गेनिंग पॉवर' वाढणार; काँग्रेस, शिंदे गटाला भानावर येण्याचा संदेश

2003 - राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे स्मृतिस्थळ देशाला अर्पण. राजीव गांधी यांची श्रीपेरांबुदूर येथे 21 मे 1991 ला हत्या झाली होती. निवडणूक सभेसाठी येथे आले असता मानवी बॉंबद्वारे गांधी यांची हत्या झालेल्या ठिकाणी हे स्मृतिस्थळ उभारण्यात आले आहे.

२०१४ ः अनेक वर्षे भारतातील बालकामगार पद्धत आणि लहान मुलांच्या तस्करीविरुद्ध लढा देणारे कैलास सत्यार्थी आणि स्त्री शिक्षणासाठी दहशतवाद्यांशीही सामना करणारी पाकिस्तानची मलाला युसूफझाई यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com