Rajya Sabha : गिरीश महाजन कोणाला गळाला लावणार, यावर निकाल ठरणार..

भाजपचे संकटमोचक म्हणून गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची ख्याती या वेळी कायम राहणार का, याची उत्सुकता
Uddhav Thackeray News, Girish Mahajan News, Jalgaon Latest Marathi News
Uddhav Thackeray News, Girish Mahajan News, Jalgaon Latest Marathi NewsSarkarnama

जळगाव, ता. ६ : भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक म्हटले जाते, पक्षाच्या राज्यातील सत्ताकाळात त्यांनी अनेक राजकीय जबाबदाऱ्या पार पाडत यश मिळवून दिले. पण 2019 पासून त्यांचीही जादू सध्या बंद पडलेली आहे. त्यांची ही जादू राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha election 2022) चालणार का, ते कोणत्या आमदारांना गळाला लावणार, यावर निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यसभेत भाजपचा तिसरा उमेदवार विजयी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यात ते यशस्वी होतात का, त्यावर बरीच गणित अवलंबून आहेत.(Jalgaon Latest Marathi News)

भाजपने महाजन यांच्यासह आशिष शेलार आणि प्रसाद लाड यांच्याकडेही या निवडणुकीची सूत्रे दिली आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाने गाठल्याने त्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीतून महाराष्ट्रात या निवडणुकीसाठी पाठविण्यात आले आहे. मुंबईतील आमदारांची जबाबदारी प्रामुख्याने शेलार आणि लाड सांभाळत आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील आमदारांशी संपर्क महाजन हे साधत आहेत. त्यांच्या गळाला किती आमदार लागणरा, याची उत्सुकता आहे.

Uddhav Thackeray News, Girish Mahajan News, Jalgaon Latest Marathi News
राज्यसभा निवडणूक : फडणवीसांचे मतदान कसे घ्यायचे? आयोगाला लिहिले पत्र

माजी मंत्री असलेले गिरीश महाजन हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले आहेत. जळगाव जिल्हयातील जामनेर विधानसभा मतदार संघातून ते पाच वेळा निवडून आले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष ते भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपर्यंत पदे त्यांनी भूषविली आहेत.ते राज्याचे माजी मुख्यमंत्री व सद्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्‍वासू आहेत. राज्यात गेल्या पंचवार्षिकमध्ये युतीचे सरकार असतांना महाजन यांच्याकडे जलसंपदा तसेच आरोग्य शिक्षण हे महत्वाचे खाते होते. तसेच राज्याच्या सरकारवर कोणतीही अडचण आल्यास ते तातडीने संबधितांशी चर्चा करून सोडवित होते. मुंबईत आलेला शेतकरी, शेतमजूर,मोर्चा, मराठा क्रांती मोर्चा यांच्यांशी चर्चेचा समन्वय त्यांनीच वेळोवेळी घडविला होता. तसेच जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलनाचा निर्णय घेतला होता.त्यावेळी तातडीने त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी महाजन गेले होते, त्यानंतर त्यांनी दिल्लीत जावूनही पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती. त्यामुळे अण्णांच्या मागणीवर तातडीने विचार झाला व आंदोलन थांबले. राज्यातील सरकारवर आणि पक्षावर आलेले संकट त्यांनी दूर केले होते. त्यामुळेच त्यांना संकटमोचक म्हटले जाते.

Uddhav Thackeray News, Girish Mahajan News, Jalgaon Latest Marathi News
राज्यसभा निवडणूक : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीआधीच फडणवीसांचा अपक्ष आमदारांना फोन!

आता विरोधी पक्षात असतानाही पक्षाची राज्यातील अनेक महत्वपूर्ण बाबीची जबाबदारी त्यांच्याकडेच असते. अगदी पहाटेचे भाजप,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाले होते. त्या शपथविधीच्या वेळीही तेच उपस्थित होते.यातही पडद्यामागे त्यांची भूमिका मोठी होते असे सागंण्यात येत आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे.महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या अटीतटीच्या प्रसंगी विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीस यांना कोरोना ची लागण झाली आहे त्यामुळे त्यांना क्वारंटाईन व्हावे लागले आहे. अशा परिस्थितीत भाजपला राज्यसभेत तिसरी जागा मिळविण्यासाठी भाजपने प्रसाद लाड,श्रीकांत भारतीय, गिरीश महाजन यांच्यावर सोपविली आहे. केंद्रीय निरिक्षकांच्या मदतीने ते रणनीती आखणार आहेत.प्रत्येव वेळी पक्षाला संकटातून तारणारे गिरीश महाजन यावेळी यश मिळवून पक्षाला तारणार काय?याकडेच आता लक्ष आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com