Assembly Session : गोऱ्हेंचे विधानसभा अध्यक्षांवर आरोप; नार्वेकरांनी ‘ती’ तरतूद वाचून दाखवत दिले उत्तर...

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पीठासिन अधिकाऱ्यांचे नियम, तरतुदी आणि कर्तव्ये वाचून दाखवली.
Nilam Gorhe-Rahul Narwekar
Nilam Gorhe-Rahul NarwekarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विधान परिषदेच्या सभापतींच्या मानसन्मानावरून विधानसभेत आज सकाळीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरीतुमरी झाली. भाजपचे आशिष शेलार आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भास्कर जाधव हे समोरासमोर आले. पण विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पीठासिन अधिकाऱ्यांचे नियम, तरतुदी आणि कर्तव्ये वाचून दाखवली. घटनेतील तरतूदींवर बोट ठेवत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काल केलेल्या भाष्याला उत्तर दिले. (Gohre's allegations against Assembly Speaker; Narvekar read out 'that' provision and replied...)

विधीमंडळाच्या आवारातील एका कार्यक्रमाबद्दल नीलम गोऱ्हे यांना माहिती देण्यात आली नव्हती. त्याबाबत विधान परिषदेत झालेल्या चर्चेत गोऱ्हे यांनी नाराजी व्यक्त करत नार्वेकर यांच्यावर काही आरोप केले होते. त्याला नार्वेकर यांनी तरतूदी वाचून दाखवत उत्तर दिले.

Nilam Gorhe-Rahul Narwekar
Supreme Court : एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद जाईल; पण सरकार टिकेल : सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकिलाने वर्तविला अंदाज

नार्वेकर म्हणाले की, पीठासिन अधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल दोन्ही सभागृहात चर्चा झाली नाही पाहिजे. पण, वास्तव काय आहे, ते सर्वांसमोर आणणे माझे कर्तव्य आहे. जे नियम आहेत, ते सर्वांना समजणे आवश्यक आहे. त्यातील दोन ते तीन ठळक मुद्दे मी सभागृहासमोर मांडतो आहे. ही दोन्ही नियम सभागृह चालविण्यासाठी आहेत.

अनुच्छेद १८० मध्ये : विधानसभेच्या अध्यक्षाचे पद रिक्त असताना त्या पदाची कर्तव्ये उपाध्यक्ष किंवा उपाध्यक्षाचे पद रिक्त असेल तर राज्यपाल नियुक्त करतील, त्या सदस्याला ती पार पाडावी लागतील.

अनुच्छेद १८४ मध्ये : विधान परिषदेच्या सभापतीचे पद रिक्त असताना त्या पदाची कर्तव्ये उपसभापती किंवा उपसभापतीचे पद रिक्त असेल तर राज्यपाल नियुक्त करतील, त्या सदस्याला ती पार पाडावी लागतील.

Nilam Gorhe-Rahul Narwekar
Assembly Session : ...अन्‌ मुख्यमंत्री शिंदे धावतच विधानसभेत पोचले!

विधीमंडळ सचिवालयांसाठीचे नियम १८७ (३) मध्ये आहेत. त्यात अशी तरतूद आहे की, विधीमंडळाच्या कामकाजासाठी राज्यपाल हे नियम बनवतील. महाराष्ट्राचे १९७३ मधील तत्कालीन राज्यपाल यांनी सभापती आणि अध्यक्षांबरोबर चर्चा करून यासंदर्भातील नियम बनविले आहेत. त्यातील नियम १६ नुसार विधीमंडळाचे प्रशासकीय निर्णय बोर्ड घेईल. त्या बोर्डमध्ये अध्यक्ष, सभापतींचा समावेश असेल, असे नार्वेकर यांनी नमूद केले.

नार्वेकर म्हणाले की, अध्यक्ष आणि सभापती या दोन्हीपैकी कोणतेही पद रिक्त असेल अथवा आपलं कार्य करण्यासाठी समर्थ नसतील तर तो अधिकार उपसभापती अथवा उपाध्यक्ष यांना जात नाही, अशी विशेष तरतूद आहे. त्यावेळी बोर्डाचे सर्व काम अध्यक्ष असतील तर अध्यक्ष आणि सभापती असतील सभापती करतील, अशी कायदेशीर तरतूद आहे. हे नियम मी सभागृहाच्या माध्यमातून इतरांना समजण्यासाठी सांगितले आहेत.

Nilam Gorhe-Rahul Narwekar
Assembly Session : गोऱ्हेंची नार्वेकरांवर टिपण्णी : विधानसभेत आशिष शेलारांचा वार; तर भास्कर जाधवांचा पलटवार

विधानसभा आणि परिषद दोन्ही समान आहेत. दोघांचा अवमान करणे, संपूर्ण विधीमंडळाला मान्य नसणार आहे. तीच भूमिका सर्व सदस्यांची आहे. त्यामुळे कोणत्या सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी कोणती आचारसंहिता पाळावी, यावर चर्चा होणे उचित नाही. त्या त्या पीठासीन अधिकाऱ्यांनी ती आचारसंहिता पाळावी, हे ठरवावे, असा टोलाही नार्वेकर यांनी गोऱ्हे यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com