Narendra Modi Record : 'मोदी मॅजिक'! PM मोदींच्या सेल्फी व्हिडिओचा 'डिजिटल धमाका'; 24 तासांत 30 कोटी व्ह्यूजसह रचला नवा जागतिक विक्रम!

PM Modi viral social media views : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडिया पोस्टला अवघ्या 24 तासांत विक्रमी व्ह्यूज मिळाले. 'मोदी मॅजिक' पुन्हा एकदा डिजिटल प्लॅटफॉर्मवर चर्चेचा विषय ठरला. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
PM Modi viral social media views
PM Modi viral social media viewsSarkarnama
Published on
Updated on

सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या इन्स्टाग्राम व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी शेअर केलेल्या सेल्फी व्हिडिओला अवघ्या 24 तासांत 303 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. यासोबतच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर जवळपास 10 लाख नवीन फॉलोअर्स जोडल्याचेही सांगितले जात आहे. या आकड्यांमुळे सोशल मीडियावर नव्या विक्रमाची चर्चा रंगली आहे.

गुरुवारी रात्री हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी पेपर लीक प्रकरणामुळे अस्वस्थ असलेल्या विद्यार्थी आणि तरुणांशी थेट संवाद साधत त्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला. काही तासांतच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि 24 तासांच्या आत 303 दशलक्ष व्ह्यूजचा टप्पा पार केल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे इन्स्टाग्रामवरील सर्वाधिक वेगाने पाहिल्या गेलेल्या रील्समध्ये या व्हिडिओची नोंद झाल्याची चर्चा आहे.

PM Modi viral social media views
Sanjay Raut : जेन झीच्या आंदोलनाचा धसका, मोदींचे मंत्री इंस्टाग्रामवर अॅक्टीव्ह, संजय राऊतांनी निशाणा साधला, 'काम कोण करणार?'

“उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेपर लीकविरोधात आणखी कठोर पावले उचलली जातील!” या कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या पोस्टला 15 दशलक्ष लाइक्स आणि 1.3 दशलक्ष कमेंट्स मिळाल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे पोस्ट केल्यानंतर पहिल्या 8 तासांतच या व्हिडिओने 56 दशलक्ष व्ह्यूज आणि 5.9 दशलक्ष लाइक्सचा टप्पा गाठल्याची माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या सोशल मीडिया पोस्ट्सना यापूर्वीही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. NEET पेपर लीकवरील व्हिडिओ, “Thank You, Friends” हा फॉलो-अप व्हिडिओ, पश्चिम बंगालमधील प्रचारादरम्यान झालमुरी खातानाचा व्हिडिओ, Vantara दौऱ्याची रील तसेच Skyroot स्पेस मिशन आणि भारतीय बॅडमिंटनच्या यशावरील पोस्ट्सनाही कोट्यवधी व्ह्यूज मिळाल्याचे सांगितले जाते.

PM Modi viral social media views
Nashik Earthquake : नाशिकमध्ये एकीकडे गोदावरीचा रुद्रावतार, दुसरीकडे एकापाठोपाठ भूकंपाचे चार धक्के, प्रशासन अलर्ट मोडवर

या व्हिडिओत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “मला माहिती आहे की पेपर लीक ही काही छोटी गोष्ट नाही. लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी ही अत्यंत दुःखद बाब आहे.” तसेच त्यांनी पुढे म्हटले, “पेपर लीकच्या घटनेनंतर गेल्या अडीच महिन्यांत अनेक प्रभावी पावले उचलण्यात आली आहेत. दोषींना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, ही आमची सर्वात मोठी जबाबदारी होती. सरकारने पूर्ण प्रयत्न करून 22 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा शक्य तितक्या कमी वेळात पुन्हा घेण्याची व्यवस्था केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com