‘मला जेलमध्ये टाकण्याच्या तारखा दिल्या जात आहेत’

‘महानंद’पासून सगळ्या जेवढ्या लावता येतील तेवढ्या चौकशा माझ्या मागे लावण्यात आलेल्या आहेत.
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : मी जेलमध्ये जाणार आहे, याच्या तारखा दिल्या जात आहेत. एक महिन्याने जाणार आहे, दोन महिन्याने जाणार आहे, असं सांगितलं जात आहे. आता सीबीआय (CBI) लागलीय माझ्यामागे. ॲंटी करप्शन ब्यूरोच्या चौकशा माझ्या मागे आहेत. आधीपासूनच माझी ईडीकडून (ED) चौकशी करण्यात येत आहे. जळगाव दूध संघ बरखास्त करून त्याचीही चौकशी लावण्यात आली आहे. ‘महानंद’पासून सगळ्या जेवढ्या लावता येतील तेवढ्या चौकशा माझ्या मागे लावण्यात आलेल्या आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सांगितले. (I am being given jail dates : Eknath Khadse)

Eknath Khadse
काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजी...ते फुटणार की... : शहाजीबापूंच्या बॉम्बगोळ्याने खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना खडसे बोलत होते. खडसे म्हणाले की, सध्या माझी सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे. ॲंटी करप्शन ब्यूरोची चौकशी माझ्यामागे आहे. सक्तवसुली संचानलयाकडून माझी आधीपासूनच चौकशी करण्यात येत आहे. आता जळगाव जिल्हा दूध संघ बरखास्त करण्यात आला आहे, त्याचीही चौकशी लावली आहे. जेवढ्या म्हणून लावता येतील, तेवढ्या चौकशा माझ्या मागे लावण्यात आलेल्या आहेत. तरीही उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच जिंकणार आहे. जर तुम्ही काहीही केलं नसले, जर तुम्ही स्वच्छ असाल, तर कुणालाही घाबरण्याची गरज नाही. त्रास होईल, छळ करतील, जेलमध्ये टाकतील पण पुन्हा बाहेर येईन. पण, लोकांना समजेल की नाथाभाऊ सत्य आहे.

Eknath Khadse
CEO आयुष प्रसादांचीच चौकशी करा : वाबळेवाडी पालकसभेचा ठराव शिंदे-फडणवीसांना देणार

जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ आता बरखास्त करण्यात आलेला आहे. जेवढ्या चौकशा करायच्या असतील तेवढ्या करा. जेवढे खोदायचे तेवढे खोदा. अनियमितता असेल तर नियमित आम्ही आधीच करून ठेवला आहे. त्यामुळे चौकशीची चिंता नाही. हे सर्व मला बदनाम करण्यासाठी चालेले आहे. मला माहिती आहे की ते सरळपणे आमच्याशी लढू शकत नाहीत. नाथाभाऊंशी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसशी लढणं हे त्यांना या जिल्ह्यात शक्य नाही, म्हणूनच जिल्हा बॅंकेची चौकशी, दूध संघ बरखास्त करून त्याची चौकशी लाव, असे प्रकार सुरू आहेत. आम्हाला बदनाम करण्यासाठी हा चौकशीचा फार्स आहे. आम्ही असं कधी केलेलंच नाही, असे कार्यकर्त्यांनी सांगितलं पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com