Raju Shetti News : मला रघुनाथदादा पाटलांचा सत्कार करायचाय : राजू शेट्टींनी व्यक्त केली इच्छा !

शरद जोशी यांनी अखेरच्या दिवसांत शेतकरी संघटनेतील सर्व नेत्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे सरसेनापती म्हणून रघुनाथदादा पाटील यांच्याकडे सूत्रे दिली होती.
Raju Shetti : Raghunathdada Patil
Raju Shetti : Raghunathdada Patil Sarkarnama

सांगली : शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी यांच्या चळवळीच्या तालमीत तयार झालेले ज्येष्ठ शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांचा जाहीर सत्कार करायचा आहे, अशी इच्छा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. (I want to honor Raghunathdada Patil: Raju Shetti expressed his desire!)

कृष्णा नदी प्रदूषणप्रश्‍नी आज (ता. २५ मार्च) सांगली येथे मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात माजी खासदार राजू शेट्टी आणि रघुनाथदादा पाटील हे एकत्र आले होते. त्यावेळी दोघांनी एकत्र चहा घेतला. खूप काळानंतर दोन मोठ्या शेतकरी नेत्यांनी एकत्र अनौपचारिक गप्पा मारल्या.

Raju Shetti : Raghunathdada Patil
SIT Inquiry : सांगली, चंद्रपूरसह चार बॅंकांतील गैरव्यवहारची एसआयटीमार्फत चौकशी : सहकारमंत्र्यांची विधान सभेत घोषणा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी म्हणाले की, ‘‘रघुनाथदादांचे आणि आमचे वैचारिक मतभेद आहेत. आमच्यात व्यक्तिगत वाद कधीच नव्हते आणि यापुढेही नसतील. परवा, आम्ही डिग्रजला जयपाल फराटे यांचा सत्कार केला. या सत्काराला एवढा विलंब झाला की जयपालअण्णांना उत्तर देण्यासाठी बोलता येत नव्हते. माझी इच्छा आहे की, मी रघुनाथदादांचा सत्कार करणार आहे. ते स्पष्टपणे बोलू शकतात, तोवर मला हा कार्यक्रम घ्यायचा आहे. मी डिग्रजमध्येदेखील ही इच्छा व्यक्त केली होती.’’

Raju Shetti : Raghunathdada Patil
Assembly Session : राहुल गांधींच्या मुद्यावर विरोधक आक्रमक : विधानसभा अध्यक्ष कारवाईचा निर्णय घेत नसल्याने सभात्याग

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या या इच्छेची सगळीकडे चर्चा होत आहे. रघुनाथदादांनी त्याला अप्रत्यक्षपणे होकार दिला आहे. शरद जोशी यांनी अखेरच्या दिवसांत शेतकरी संघटनेतील सर्व नेत्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे सरसेनापती म्हणून रघुनाथदादा पाटील यांच्याकडे सूत्रे दिली होती. तो प्रयत्न काही फळाला आला नाही. मात्र, आता राजू शेट्टी आणि रघुनाथदादांनी एकमेकांप्रती सन्मान व्यक्त करत मतभेद असले तरी जोशींच्या विचारांचा वारसा महत्त्वाचा असल्याचे दाखवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com