'पवारसाहेब, आमच्यापेक्षा तुम्ही फार पॉवरफुल्ल आहात...बागुलांसाठी काँग्रेसश्रेष्ठींकडे शब्द टाका!'

बागूल हे ध्येयनिष्ठ आणि एकनिष्ठ असलेले नेते आहेत.
Sushil Kumar Shinde-Sharad Pawar-Aba Bagul
Sushil Kumar Shinde-Sharad Pawar-Aba BagulSarkarnama
Published on
Updated on

पुणे : आबा बागूल (Aba Bagul) आज काँग्रेसमध्ये (Congress) आहेत. पण ते बाजूच्या (राष्ट्रवादी काँग्रेस NCP) पक्षात गेले असते, तर केव्हाच आमदार आणि मंत्री झाले असते. पवारसाहेब मला सांगत होते की बागूलांना आता तुमच्याकडून तिकिट द्या. पवारसाहेब ही तुमची आज्ञाच आहे. आम्ही जरूर प्रयत्न करू. पण आमच्यापेक्षा तुम्ही वर (काँग्रेस हायकमांडजवळ) फार पॉवरफुल्ल आहात, तुम्ही फक्त शब्द टाका, ते ताबडतोब करतील, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (SushilKumar Shinde) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना बागूल यांच्या विधानसभा तिकिटासाठी काँग्रेस श्रेष्ठींशी बोलावे असे सूचवले. (Sharad Pawar should speak to Congress elites for Aba Bagul's ticket : Sushil Kumar Shinde)

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते यंदाचा महर्षी पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पवार होते. माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते.

Sushil Kumar Shinde-Sharad Pawar-Aba Bagul
‘तुझा होकार आहे की नाही, ते सांग. शेवटचं विचारतोय’ : बारामतीच्या पोलिस अधिकाऱ्याचा महिलेला अश्लील मेसेज

माजी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आबा बागूल हे सहा टर्म नगरसेवक आहेत. मी उल्हास पवारांना म्हटलं, बागूल काँग्रेसमध्ये आहेत. पण, ते बाजूच्या (राष्ट्रवादी काँग्रेस) पक्षात गेले असते, तर केव्हाच आमदार आणि मंत्री झाले असते. बागूल हे ध्येयनिष्ठ आणि एकनिष्ठ असलेले नेते आहेत. सत्ता येते काय आणि जाते काय. पण बागूल यांच्यासारखे कार्यकर्ते पक्के असतात.

Sushil Kumar Shinde-Sharad Pawar-Aba Bagul
Andheri East By-Election : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा

पवारसाहेबही आता मला म्हणत होते की, आबा बागूल यांना काँग्रेसकडून तिकिट द्या. पवारसाहेब ही तर तुमची आमच्यासाठी आज्ञाच आहे. आम्ही तर प्रयत्न करूच. पण, आमच्यापेक्षा तुम्ही वर (काँग्रेसश्रेष्ठींजवळ) फार पॉवरफुल्ल आहात, तुम्ही फक्त शब्द टाका, ते ताबडतोब मान्य करतील. आम्ही आमची जबाबदारी काही झटकत नाही. जरूर त्यांना आम्ही मदत करू, असेही शिंदे यांनी म्हटले.

Sushil Kumar Shinde-Sharad Pawar-Aba Bagul
फडणवीसांसोबत बसून खडसेंना काय मिटवायचं होतं : महाजनांच्या गौप्यस्फोटानंतर चर्चेला उधाण

ते म्हणाले की, आपली सर्व शक्ती सर्वधर्मांसाठी वापरतो, त्या कार्यकर्त्याला कोण अडवणार आहे. पण, ते झालं. पुण्यात अशा गोष्टी होतात. त्या करेक्टीव्ह होतात. स्वातंत्रपूर्व काळापासून हे चालत आलेले आहे, त्यामुळे पुण्याच्या बाबात हे काही नवीन नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com