Tukaram Munday News : वनवास कधी संपणार; तुकाराम मुंडे अजूनही वेटींगवरच!

Tukaram Munday News : 'आयएएस' आधिकारी तुकाराम मुंडे यांची आरोग्य विभागातून बदली होऊन एक महिना उलटला.
Tukaram Munday News
Tukaram Munday NewsSarkarnama
Published on
Updated on

Tukaram Munday News : 'आयएएस' आधिकारी तुकाराम मुंडे (Tukaram Munday) यांची आरोग्य विभागातून बदली होऊन एक महिना उलटला. मात्र, अद्याप त्यांना नवे ‘पोस्टींग’ देण्यात आले नाही. आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या ‘विशेष आग्रहा’ मुळे मुंडे यांची गेल्या महिन्यात बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुंडे यांच्या बदलीने आरोग्य विभागातील कामकाज पद्धतीबाबत मोठी चर्चा झाली.

आरोग्य विभागामध्ये शिस्त आणून कार्यसंस्ककृती निर्माण करू पाहणाऱ्या मुंडे यांची बदली करण्यामागे आरोग्य विभागातील आधिकाऱ्यांची लॉबी तसेच आरोग्य विभागातील कंत्राटदारांचे हितसंबंध होते, असे आता बोलले जाऊ लागले आहे. या साऱ्या घडामोडींनंतर मुंडे यांना नवे ‘पोस्टींग’ मिळणार की त्यांना पुन्हा वेटींगवरच राहावे लागणार याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Tukaram Munday News
Balasaheb Thorat News : पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे बाळासाहेब थोरातच नाराज?

कोरोना काळात ‘इमर्जन्सी’च्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने खरेदी करण्यात आली. त्यात अनेक आधिकाऱ्यांचे हात ओले झाले. यात कंत्राटदारांनी मोठी भूमिका बजावल्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंडे यांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले होते. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर मुंडे यांना आरोग्य विभागातील महत्वाचे पद देण्यात आले.

त्यांनी लागलीच कामाला सुरवात केली. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रूग्णालयांची पाहणी सुरू करीत शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी काम करताना त्यांनी स्वत:च्या कामाच्या पद्धतीत काहीसा बदल केला. कोणत्याही आधिकारी वा कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई न करता ताकीद देऊन कामात सुधारणा करण्याची संधी त्यांनी संबंधितांना दिली. त्याचे चांगले परिणाम दिसले. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचे आरोग्य सुधारण्यास सुरवात झाली.

आधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावत असतानाच मुंडे यांनी कोरोना काळातील कामाची माहिती मागविली. त्या काळात झालेल्या खरेदी प्रकरणाच्या अनेक रंजक कथा कानावर पडल्याने या प्रकरणाच्या संपूर्ण फाईल्स त्यांनी मागविली. अनेक गोष्टी लक्षात आल्यानंतर कोरोना (Corona) काळातील खरेदीची चौकशी करण्याची तयारी सुरू केली.

या त्यांच्या निर्णयापासूनच त्यांच्या बदलीच्या प्रयत्नांना सुरवात झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देण्याऐवजी स्वतंत्र खासगी प्रॅक्टीस करणारे डॉक्टर आधीपासूनच मुंडे यांच्या रडारवर होते. त्यामुळे कंत्राटदारांच्या लॉबीबरोबरच डॉक्टारांच्या लॉबीनेदेखील आपली ताकद वापरत मुंडे यांच्या बदलीसाठी प्रयत्न केले.

Tukaram Munday News
Nana Patole News : सत्यजीत तांबेंची खेळी फसली? काँग्रेसने नाशिक पदवीधरसाठी जाहीर केला उमेदवार

कंत्राटदार आणि डॉक्टर लॉबीच्या आग्रहाने आरोग्यमंत्री सावंत यांनी गेल्या महिन्यात मुंडे यांची बदली केली. मुंडे यांना आरोग्य विभागात सलगपणे दोन महिनेदेखील काम करता आले नाही. दोन महिने पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली झाली. डॉक्टर, कंत्राटदार व राजकारण्यांच्या सोयीसाठी मुंडे यांची बदली झाली असली तरी यातून सामान्य माणसाचे नुकसान झाले आहे.

मुंडे यांना वर्षभराचा काळ जरी मिळाला असता तरी त्यांनी राज्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा चेहरा-मोहरा बदलून टाकला असता. मात्र, राज्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या नशीबी चांगली आरोग्य व्यवस्था नव्हतीच. त्यामुळे मुंडे यांची बदली झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com