Solapur BJP News : होय, मला केसीआर यांची ऑफर,आता विचार करण्याची वेळ; रावांच्या भेटीनंतर भाजप नेत्याचे स्पष्ट संकेत

सोमवारी सायंकाळी केसीआर यांच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी नागेश वल्याळ यांची भेट घेतली होती. त्यांच्यामध्ये अर्धा तास बंद दरवाजाआड चर्चाही झाली होती.
KCR Meet Solapur BJP Leader
KCR Meet Solapur BJP LeaderSarkarnama
Published on
Updated on

Solapur politic's : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडून मला भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करण्याची ऑफर देण्यात आलेली आहे. मी कालपर्यंत सांगत होतो की, मी भारतीय जनता पक्ष सोडणार नाही. पण, केसीआर यांच्या आग्रहामुळे आता विचार करण्याची वेळ आली आहे, अशी भावना भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार (स्व.) लिंगराज वल्याळ यांचे सुपुत्र नगरसेवक नागेश वल्याळ यांनी केसीआर यांच्या भेटीनंतर व्यक्त केली. (KCR's offer to join BRS party: Nagesh Valyal)

भाजपचे (BJP) नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या निवासस्थानी आज तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि त्यांच्या मंत्र्यांनी पंढरपुरात येऊन भेट दिली. त्यावेळी सोलापुरातील (Solapur) भाजपचे नगरसेवकही (corporator) उपस्थित होते. त्यामुळे वल्याळ यांच्या पक्षांतराबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी केसीआर यांच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी नागेश वल्याळ यांची भेट घेतली होती. त्यांच्यामध्ये अर्धा तास बंद दरवाजाआड चर्चाही झाली होती.

KCR Meet Solapur BJP Leader
Bhagirath Bhalke : केसीआर यांनी पाठ फिरवताच भगीरथ भालकेंनी राजकीय भूमिका बदलली...

नागेश वल्याळ म्हणाले की, मला केसीआर यांनी आवर्जून ऑफर दिली आहे. कालपर्यंत मी सांगत होतो की, मी भारतीय जनता पक्ष सोडणार नाही. पण, त्यांच्या आग्रहामुळे आता विचार करण्याची वेळ आली आहे. सोलापूरचा विकास खुंटला असून सोलापूरला पुढे नेण्यासाठी तुझ्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. सोलापुरातील आणखी काही नेते पक्षप्रवेश करणार आहेत, असेही त्यांनी मला सांगितले.

KCR Meet Solapur BJP Leader
KCR In Pandharpur: BRS साठी पश्चिम महाराष्ट्राचा दरवाजा उघडणारे भगीरथ भालकेंच्या पाठीशी ताकदीने उभे राहणार; KCR यांचा पंढरपूरकरांना शब्द

बीआरएस पक्ष तेलंगणाचा असल्यामुळे आमच्या घरचा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मी त्यांना वेळ मागितली आहे. त्यांना सांगितलं की आम्ही सर्वजण ठरवतो. मी एवढ्या लवकर पक्षप्रवेश करू शकत नाही. माझ्या वडिलांचे संपूर्ण अस्तित्व या महाराष्ट्रात गेले आहे, ते पश्चिम महाराष्ट्राचे नेते होते. या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी मला वेळ हवा आहे, तो मी मागून घेतला आहे.

KCR Meet Solapur BJP Leader
Solapur DCC Bank : अकराशे कोटींच्या थकबाकीची जबाबदारी १८ संस्थांवर होणार निश्चित; मोहिते पाटलांपासून सोपलांपर्यंत बड्या नेत्यांचा समावेश

केसीआर यांच्या भेटीवेळी आलेले सर्व नगरसेवक हे माझ्यासोबत आमचे तेलंगणातील सिद्धीपेठ या गावी आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या पाहुणचारासाठी आम्ही आलो होतो. एखाद्या मुख्यमंत्री आपल्या घरी येत असेल तर ते आपल्यासाठी चांगलीच गोष्ट आहे ना. मी सध्या कुठे आहे, हे मलाच माहिती नाही, त्यामुळे ते नगरसेवक माझ्याबरोबर असतील, हे मी आत्ताच कसे सांगू शकेन. भविष्यात सर्व सहकारी नगरसेवक, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असेही वल्याळ यांनी नमूद केले.

KCR Meet Solapur BJP Leader
Pandharpur BRS News : बीआरएससारख्या छोट्या पार्टीला एवढं का घाबरता?; KCR यांचा राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांना सवाल

भाजपमध्ये माझ्यासोबत असं काही घडलंच नाही की, मी हताश व्हावं. पण, मला वाटतंय सोलापूरची प्रगती व्हावी. तेलंगणात गेल्यानंतर तेथील विकास मी पाहतो. तो विकास माझ्या सोलापुरात व्हायला पाहिजे. तेलंगणाच्या तुलनेत आपल्या सोलापूरचा विकास नक्कीच झालेला नाही, असं मला वाटतं. त्यासाठी मी नक्की विचार करेन, असे संकेतही वल्याळ यांनी दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com