Solapur DCC Bank : अकराशे कोटींच्या थकबाकीची जबाबदारी १८ संस्थांवर होणार निश्चित; मोहिते पाटलांपासून सोपलांपर्यंत बड्या नेत्यांचा समावेश

सहकार विभागातील निवृत्त अप्पर निबंधक डॉ. किशोर तोष्णीवाल यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
Solapur DCC bank
Solapur DCC bankSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या राजकारणात आणि जिल्हा बँकेच्या प्रशासनात खळबळ उडवून देणारी कारवाई सहकार विभागाने हाती घेतली आहे. जिल्हा बँकेत संचालकांनी बेकायदेशीरपणे वाटप केलेल्या, थकीत राहिलेल्या कर्जाची जबाबदारी निश्‍चित केली जाणार आहे. त्यासाठी सहकार विभागातील निवृत्त अप्पर निबंधक डॉ. किशोर तोष्णीवाल यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. (Solapur 'DCC' will be responsible for arrears of 1100 crores; Appointment of Officer by Bank)

डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी १८ कर्ज प्रकरणांतील जवळपास १ हजार १०० कोटी रुपयांच्या थकीत रक्कमेची जबाबदारी निश्‍चित करण्यास सुरवात केली आहे. या रक्कमेस जबाबदार असलेल्या तत्कालीन संचालक, अधिकारी/कर्मचारी यांना नोटीस बजावली आहे.

Solapur DCC bank
Pandharpur BRS News : बीआरएससारख्या छोट्या पार्टीला एवढं का घाबरता?; KCR यांचा राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांना सवाल

थकबाकीदारांमध्ये माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांच्याशी संबंधित असलेला आणि आता बीडच्या राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्याला विकण्यात आलेला आर्यन शुगरकडे ३२२ कोटी २७ लाख तीन हजार रुपये थकीत आहेत. त्यानंतर भाजपचे (BJP) माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या ताब्यात असलेल्या स्वामी समर्थ साखर कारखान्याकडे १८५ कोटी ८ लाख ६१ हजार तर सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्याकडे १३७ कोटी, शिवरत्न उद्योगकडे १४६ कोटी ६९ लाख ९८ हजार रुपये, तर भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील चेअरमन असलेल्या शंकर सहकारी साखर कारखान्याकडेही एकूण ९७ कोटी ५३ लाख ४९ हजार रुपये थकीत आहेत. या सर्वांची जबाबदारी आता निश्चित करण्यात येणार आहे.

Solapur DCC bank
KCR In Pandharpur: BRS साठी पश्चिम महाराष्ट्राचा दरवाजा उघडणारे भगीरथ भालकेंच्या पाठीशी ताकदीने उभे राहणार; KCR यांचा पंढरपूरकरांना शब्द

जिल्हा बॅंकेच्या या कर्ज प्रकरणांमध्ये जबाबदारी निश्‍चित होणार

१. शंकर सहकारी साखर कारखाना

मुद्दल :३३ कोटी ५१ लाख १७ हजार

व्याज : ६४ कोटी २ लाख ३२ हजार

एकूण : ९७ कोटी ५३ लाख ४९ हजार

२. सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना :

मुद्दल :३५ कोटी ६७ लाख ७७ हजार

व्याज : १०१ कोटी २७ लाख २ हजार

एकूण : १३७ कोटी १२ लाख ९७ हजार

३. स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना :

मुद्दल : ५८ कोटी ४७ लाख २२ हजार

व्याज : १२६ कोटी ६१ लाख ३९ हजार

एकूण : १८५ कोटी ८ लाख ६१ हजार

Solapur DCC bank
Bhagirath Bhalke Join BRS : मोहोळचा पोपट काल खूप बोलून गेला, पण, भालके काय चीज आहे, ते त्याला दाखवतो;भालकेंचे उमेश पाटलांना चॅलेंज

४. प्रियदर्शिनी सहकारी साखर कारखाना (तोंडार, ता. उदगीर, जि. लातूर) :

व्याज : ३५ लाख ०१ हजार

एकूण : ३५ लाख ०१ हजार

५. घृष्णेश्‍वर सहकारी साखर कारखाना (खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) :

व्याज : १ कोटी ६३ लाख ८ हजार

एकूण : १ कोटी ६३ लाख ८ हजार

६. निनाईदेवी सहकारी साखर कारखाना (कोक्रूड, ता. वाळवा, जि. सांगली) :

मुद्दल : ९८ लाख ०४ हजार

व्याज : १ कोटी ५८ लाख

एकूण : २ कोटी ५६ लाख ०४ हजार

७. संतनाथ सहकारी साखर कारखाना :

मुद्दल : ८० लाख ७१ हजार

व्याज : ४ कोटी ९२ लाख ३२ हजार

एकूण : ५ कोटी ७३ लाख ०३ हजार

Solapur DCC bank
Bhiwandi's NCP Corporator Disqualified : मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला मोठा दणका; भिवंडीचे राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक अपात्र

८. संत दामाजी सहकारी साखर कारखाना :

मुद्दल : ८ कोटी ४५ लाख ९७ हजार

व्याज : ९ कोटी ७४ लाख ३६ हजार

एकूण : १८ कोटी २० लाख ३३ हजार

९. सिद्धनाथ शुगर :

मुद्दल : ९६ लाख ०६ हजार

व्याज : ७३ लाख ५२ हजार

एकूण : १ कोटी ५९ लाख ५८ हजार

१०. आदित्यराज शुगर :

मुद्दल : १७ कोटी ८२ लाख ८६ हजार

व्याज : ४२ कोटी ३६ लाख २४ हजार

एकूण : ६० कोटी १९ लाख १ हजार

११. गोविंदपर्व ॲग्रो :

मुद्दल : १२ कोटी ९५ लाख ४३ हजार

व्याज : २८ कोटी ०७ लाख ९३ हजार

एकूण : ४१ कोटी ३ लाख ३६ हजार

Solapur DCC bank
NCP Leader Warn To Bhalke : भगीरथ भालके विधानसभेला कसे निवडून येतात, तेच आम्ही बघतो; राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटलांचा इशारा

१२. ज्ञानेश्‍वर मोरे शुगर फॅक्टरी :

मुद्दल : ५ कोटी ५८ लाख ५६ हजार

व्याज : १० कोटी १२ लाख ६४ हजार

एकूण : १५ कोटी ७१ लाख २ हजार

१३. आर्यन शुगर :

मुद्दल : ७६ कोटी ६० लाख १९ हजार

व्याज : २५१ कोटी ६७ लाख ११ हजार

एकूण : ३२२ कोटी २७ लाख ३ हजार

१४. शिवरत्न उद्योग :

मुद्दल : २ कोटी ११ लाख

व्याज : १४४ कोटी ५८ लाख ९८ हजार

एकूण : १४६ कोटी ६९ लाख ९८ हजार

१५. मंगळवेढा ड्रायफूडर रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट कार्पोरेशन :

मुद्दल : ४३ लाख १३ हजार

व्याज : १ कोटी १० लाख ८४ हजार

एकूण : १ कोटी ५३ लाख ९७ हजार

Solapur DCC bank
CM Visit To Pandharpur : कलेक्टर, मी कुणालाही सोडणार नाही; हार्ड ॲक्शन घेईन; पंढरपुरात पाणी नसल्याने मुख्यमंत्री संतापले

१६. पंचरत्न कुक्कुटपालन संघ :

मुद्दल : १२ लाख ५८ हजार

व्याज : ६५ लाख ४४ हजार

एकूण : ७८ लाख २ हजार

१७. उत्तर सोलापूर तालुका खरेदी-विक्री संघ :

मुद्दल : १६ लाख ६९ हजार

व्याज : २ कोटी ४ लाख १४ हजार

एकूण : २ कोटी २० लाख ८३ हजार

१८. शरद शेतकरी सहकारी सूतगिरणी :

मुद्दल : ४ कोटी ८ लाख ४ हजार

व्याज : ५९ कोटी १८ लाख १ हजार

एकूण : ६३ कोटी २६ लाख ५ हजार

आर्यन शुगरची जबाबदारी नेमकी कोणावर?

माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याशी संबंधित असलेल्या आर्यन शुगरकडे जिल्हा बॅंकेची एकूण ३२२ कोटी २७ लाख ३ हजार थकीत होते. तो आर्यन शुगर काही महिन्यापूर्वी बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बजरंग सोनवणे यांना विक्री करण्यात आलेला आहे. त्याची जबाबदारी कोणावर निश्चित होते, हा औत्सुक्याचा विषय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com