
Kolhapur MP Shahu Maharaj and Hatkanangle MP Dhairyasheel Mane : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून एक वर्ष झाले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीचा तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचा विजय झाला. पण वर्ष झाले तरी या खासदारांचे रिपोर्ट कार्ड रिकामेच दिसत आहे. विकास कामाबाबत इंडिया आघाडीच्या खासदारांची अडचण तर सत्तेतील खासदारांचा खोळंबाच झाल्याचा दिसून येतो. लोकसभेला एक वर्ष उलटूनही कोल्हापूरच्या पदरी अजून निराशाच आहे. मोठा प्रकल्पही सोडा, एका विकास कामाचे उद्घाटन देखील पंचवार्षिक मध्ये झालेले नाही.
केंद्राच्या फारशा योजनाही जिल्ह्यात सुरू नाहीत. तर गेल्या पाच वर्षात भूमिपूजन झालेले प्रकल्पही प्रगतीपथावर नाहीत. कोल्हापूरचा बास्केट ब्रिज, वैभववाडी रेल्वे यांचे भूमिपूजन झाले पण कागदावरच विकास काम रखडले अशी अवस्था आहे.एकूणच कोल्हापूरच्या विकासाची झोळी रिकामीच आहे.
देशात भाजप आणि घटक पक्षांचे सरकार स्थापन झाले. मात्र कोल्हापूरच्या पदरी अद्याप फारसे काही आले नाही. वैभववाडी-कोल्हापूर हा रेल्वे प्रकल्प उद्घाटन झाले तरी दहा वर्ष अद्याप कागदावरच आहे. रत्नागिरी-नागपूर रस्ता अद्याप पूर्ण नाही. कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण झाले. मात्र, अजूनही विमानसेवा सुरळीत नाही.
देशातील महत्त्वाच्या शहरांशी कनेक्टिव्हिटी नाही. बास्केट ब्रिजचे देखील केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले मात्र अद्याप कुदळ मारली नाही. शहरातील उड्डाणपुलापैकी शिरोली पूल ते शिवाजी पूल हा उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणार आहे. मात्र, अद्याप त्याचा आराखडा नक्की नाही. शहरात ई-बस सुरू होणार होती. मात्र, वर्षभरापासून चार्चिंग स्टेशन उभारण्याचेच काम सुरू आहे.
नवीन औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव आहे; पण अद्याप ठोस निर्णय नाही. संरक्षण, माहिती-तंत्रज्ञानातील कोणताही मोठा शासकीय प्रकल्प जिल्ह्यात अद्याप आलेला नाही. केंद्र सरकारची एखादी मोठी प्रशिक्षण किंवा संशोधन संस्थाही जिल्ह्याला मंजूर झाली नाही. कोल्हापूर-मिरज महामार्गाचे दुहेरीकरणही अद्याप पूर्ण नाही. वंदेभारत एक्स्प्रेस पुण्यापर्यंत सुरू झाली; मात्र अद्याप ती मुंबईपर्यंत गेलेली नाही. केंद्राच्या अन्य योजनाही जिल्ह्यात फारशा नाहीत. इचलकरंजी येथील टेक्सटाईल पार्क, औद्योगिक सांडपाणी प्रकल्पाचेही काम पूर्ण नाही. एकूणच एक वर्ष झाले तरी कोल्हापूरच्या विकासाची झोळी रिकामीच आहे.
त्याबाबत खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्याशी बातचीत केली. केंद्र सरकारचा विकास कामे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारकडून समन्वय साधला जात नाही. अशी खंत खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केली. तर खासदार धैर्यशील माने यांच्याशी संपर्क असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.