Kapil Sibal NCP News : शिवसेनेच्या फुटीनंतर राज्यात पुन्हा एक राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याच बरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही दावा सांगितला. या सर्व घटनांवर जेष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांनी आपले मत व्यक्त केले.
अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार यांची निवड करण्यात आल्याचे पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आहे. त्यावर सुमारे ४० आमदारांच्या सह्या आहेत. शरद पवार यांच्या गटाकडून आयोगाकडे कॅव्हिएट दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. त्याच प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना मिळेल का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
या चर्चेवर जेष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. सिब्बल यांनी 'द वायर'शी बोलताना सांगितले की, अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळणार नाही. याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
या मुलाखतीत सिब्बल यांनी शिवसेनेचे (Shivsena) चिन्ह आणि नाव हे एकनाथ शिंदे यांच्याकडे राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल देताना म्हटले आहे की, विधानसभेतील आणि संसदेतील सदस्यांच्या संख्येवर पक्ष कोणाचा हे ठरवले जाऊ शकत नाही. त्यासाठी संघटनेतील बहुमतही विचारात घेतले पाहिजे.
त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळू शकते, असेही सिब्बल म्हणाले. या प्रमाणेच केवळ आमदारांच्या संख्येवर अजित पवार यांना राष्ट्रवादीचे नाव व चिन्ह मिळणार नसल्याचे सिब्बल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आज ता. 6 जुलै शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रीय कार्यकारीनीची दिल्लीत बैठक घेतली. यामध्ये खासदार प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे आणि नऊ आमदारांचे निलंबन केले आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या मुंबईत दोन स्वतंत्र बैठका आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये अजित पवार यांच्या बैठकीला दोन खासदार आणि जवळपास ३२ आमदार उपस्थित होते. तर शरद पवार यांच्या बैठकीला १७ आमदार आणि सात खासदार उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.