Lok Sabha Election 2024 : एक उमेदवार किती मतदारसंघांत उभा राहू शकतो, किती अर्ज भरण्याची आहे मुभा? जाणून घ्या...

Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाची उमेदवार, उमेदवारी अर्जाबाबत नियमावली आहे. त्यानुसारच निवडणुकीचे संपूर्ण कामकाज चालते. त्यामध्ये एक त्रुटी आढळली तरी उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे अर्ज दाखल करताना उमेदवारांना खूप काळजी घ्यावी लागते.
Election Commission of India
Election Commission of IndiaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. राज्यात सध्या तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. अद्याप उमेदवारी जाहीर झाली नसली तरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चार अर्ज घेतले आहेत. तर सांगलीत काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी दोन अर्ज भरले आहेत. त्यामुळे एक उमेदवारी किती अर्ज भरू शकतो, किती मतदारसंघांत उभा राहू शकतो, याबाबत तुमच्या मनात नक्कीच उत्सुकता वाढली असेल.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission) उमेदवार, उमेदवारी अर्जाबाबत काही नियमावली निश्चित केली आहे. त्यानुसारच निवडणुकीचे संपूर्ण कामकाज पार पडते. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी असतात. त्यांच्या कार्यालयातून संबंधित मतदारसंघाचे कामकाज चालते. त्यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज देणे, भरणे, छाननी आदी प्रक्रिया चालते. त्यासाठीची वेळही निश्चित केली जाते.

Election Commission of India
Lok Sabha Election News : 'एबी' फॉर्म म्हणजे काय रे भाऊ !

चार अर्ज भरू शकतात

उमेदवारांना सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी अथवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करता येतो. एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार उमेदवारी अर्ज दाखल करता येतात. काही त्रुटींमुळे उमेदवारी अर्ज बाद होऊ नये, यासाठी उमेदवारांकडून एकाहून अधिक अर्ज भरण्याची दक्षता घेतली जाते. इतर उमेदवारांना उमेदवारी अर्जातील त्रुटींवर आक्षेप घेता येतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन मतदारसंघांत भरता येतात अर्ज

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एका उमेदवाराला दोन मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करता येतात. मागील निवडणुकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेठी आणि वायनाड मतदारसंघातून अर्ज भरले होते. त्यांचा अमेठीत पराभव झाला तर वायनाडमध्ये विजय मिळाला होता. दोन्ही मतदारसंघात विजय मिळाल्यास एका मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा द्यावा लागतो.

अर्ज दाखल करतेवेळी केवळ पाच व्यक्ती उपस्थित राहू शकतात. शपथ पत्र पूर्ण भलेले असावे. अपूर्ण असेल तर अर्ज रद्द होवू शकतो. नमुना c 1 ची वर्तमानपत्रातून प्रसिद्धी करावी लागते. मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी अर्ज ‘अ’ आणि ‘ब’ म्हणजेच एबी फॉर्म (AB Form) भरणे आवश्यक  आहे.

एवढी असते अनामत रक्कम

उमेदवारी अर्ज भरताना अनामत रक्कम जमा करावी लागते. सर्वसाधरण प्रवर्गासाठी 25 हजार रुपये  व राखीव  प्रवर्गासाठी 12 हजार 500 रुपये अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. मान्यता नसलेल्या पक्षाच्या व अपक्ष  उमेदवार यांना दहा सूचक आवश्यक आहे. हे सूचक त्याच मतदासंघांतील रहिवासी असायला हवेत, अन्यथा अर्ज बाद होऊ शकतो.

R

Election Commission of India
Baramati Lok Sabha Constituency : बारामतीत ट्विस्ट पे ट्विस्ट ! अजितदादांनंतर सुनंदा पवारांनीही घेतला उमेदवारी अर्ज

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com