Lok Sabha Election 2024 News : लोकसभा निवडणुकीचा 'कंट्रोल' महिलांच्या हाती..?

Election News : निवडणुकीत महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढावी, त्याशिवाय मतदान प्रक्रियेत महिलांचा अधिक रचनात्मक सहभाग व्हावा, या दृष्टीकोनातून 'महिला नियंत्रित मतदान केंद्रे' स्थापन करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील 440 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांच्या हाती असणार आहे.
election Duty
election Duty Sarkarnama
Published on
Updated on

Political News : लोकसभेसाठी देशभरात शुक्रवारी दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील असून त्यासाठी सर्वच जण कामाला लागले आहेत. निवडणुकीत महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढावी, त्याशिवाय मतदान प्रक्रियेत महिलांचा अधिक रचनात्मक सहभाग व्हावा, या दृष्टीकोनातून 'महिला नियंत्रित मतदान केंद्रे' स्थापन करण्यात आली आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commsion) आदेशानुसार, महाराष्ट्रातील 440 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील काही मतदान केंद्रांचे (Election Booth) नियंत्रण महिलांकडे सोपवण्यात आले आहे. या मतदान केंद्रांवर तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक ड्युटीवर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच महिला असणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या आठ मतदारसंघात अशास्वरुपाच्या 73 मतदान केंद्राचा समावेश आहे. (Lok Sabha Election 2024 News)

election Duty
Lok Sabha Election 2024 : हृदयविकाराचा झटका अन्..! मतदानाच्या रांगेतच डॉक्टरने वाचवले महिलेचे प्राण

या मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी महिलाच मतदान प्रक्रियेत महिलांचा रचनात्मक सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालवलेली मतदान केंद्र तयार करण्यावर भर दिला आहे. या मतदान केंद्रांवर तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक ड्युटीवर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच महिला असणार आहेत. महिला नियंत्रित असलेल्या सर्व मतदान केंद्रांवर कोणत्याही विशिष्ट रंगाचा वापर केला जाणार नाही. मतदान केंद्रांवर कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर केला जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.

महिलांचा सहभाग वाढण्यास होणार मदत

'महिला नियंत्रित मतदान केंद्रे' स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. महिला मतदान केंद्राची निवड करताना केंद्राच्या सुरक्षेचा विचार केला जाणार आहे. तहसील कार्यालय, पोलीस ठाण्याजवळील केंद्रे आणि अशा मतदान केंद्रांची निवड केली जाईल, जेथे निवडणूक अधिकारी सतत संपर्कात असणार आहेत. या केंद्रांवर फक्त महिला अधिकारी, कर्मचारी असणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसऱ्या टप्प्यातील या केंद्राचा समावेश

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील 440 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे सोपवण्यात आले आहे. त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या अकोल्यात 6, अमरावतीमध्ये 8, बुलढाण्यात 14, हिंगोलीमध्ये 6, नांदेडमध्ये 20, परभणीमध्ये 4, वर्धा 8 आणि वाशीम-यवतमाळ मतदार संघातील 7अशा एकूण आठ मतदारसंघात 73 मतदान केंद्राचा समावेश आहे. ही सर्व केंद्रे महिला कर्मचाऱ्यांच्या अधिपत्याखाली आहेत.

हिंगोलीतील संपूर्ण मतदान केंद्रच गुलाबी

हिंगोली शहरातील सीटीक्लब मैदानावरील सखी मतदान केंद्रावर शुक्रवारी अल्हाददायक चित्र पहावयास मिळाले. महिला अधिकारी व कर्मचारी असलेली ही मतदान केंद्रे गुलाबी रंगाच्या फुग्यांनी सजविलेले आहेत. त्यासोबतच महिला कर्मचाऱ्यांचेही गुलाबी ड्रेस कोड, केंद्रात ठिकठिकाणी लावलेली गुलाबी रंगाच्या फुग्यांचे गुच्छ अन टेबलवरील कपडेही गुलाबी त्यामुळे संपूर्ण मतदान केंद्रच गुलाबी अन अल्हाददायक झाल्याचे चित्र होते.

election Duty
Vitthal Sugar Factory : पवार सोलापूर जिल्ह्यात असतानाच अभिजित पाटलांच्या विठ्ठल कारखान्यावर जप्तीची कारवाई

पुढच्या टप्प्यातील जिल्हानिहाय मतदान केंद्र

अहमदनगरमध्ये 12, औरंगाबादमध्ये 20, बीडमध्ये 6, धुळ्यात 5, जालन्यात 5, कोल्हापुरात 10, लातूरमध्ये 6, मुंबई शहरात 10, नंदुरबारमध्ये 4, उस्मानाबादमध्ये 16, पालघरमध्ये 6, पुण्यात 21, रायगडमध्ये 7, सांगली 8, सातारा 16, सोलापूर 22 या मतदान केंद्रांवर महिला अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

election Duty
Lok Sabha Election News : गेल्या लोकसभा निवडणुकीत 99 उमेदवारांनीच वाचवली होती अनामत रक्कम

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com