Lok Sabha Election Result : मुंबईचा फैसला मराठी मतांनी केला, 'आघाडी'ला दिले बळ!

Mahavikas Aghadi won due to Marathi votes in Mumbai : मनसेला महायुतीमध्ये घेत मराठी मतांमध्ये फूट पाडण्याचा महायुतीचा डाव देखील सपशेल फेल ठरला.
Narendra Modi Uddhav Thackeray
Narendra Modi Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election : मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघाचा निकाल मुंबई कोणाची हे ठरणार होते. शिवसेना (ठाकरे) गटच मुंबईंचा किंग असल्याचे सांगितले जात असले तरी शिवसेनेतील फूटीनंतर पुन्हा एकदा मुंबई आमचीच हे ठाकरे गटाला दाखवून द्यावे लागणार होते. महाविकास आघाडी सोबत लढणाऱ्या ठाकरेंना मुंबईच्या निकालाने बळ मिळावे. कारण महाविकास आघाडीचे सहा पैकी चार उमेदवार मुंबईत विजयी झाले. या विजयामध्ये मराठी मतांनी आघाडीला बळ दिल्याचे दिसले.

महाविकास आघाडीने विजय मिळवलेल्या चार जागांमध्ये मराठी मतांनी निर्णायक भूमिका बजावली. मनसेला महायुतीमध्ये घेत मराठी मतांमध्ये फूट पाडण्याचा महायुतीचा डाव देखील सपशेल फेल ठरला. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत मराठी मते कायम राहिल्याचे दिसून आले.

ईशान्य मुंबईमध्ये भाजपची BJP ताकद जास्त आहे. या मतदारसंघात सर्वाधिक मराठी मते असली तरी युती असताना हा मतदारसंघाने भाजपला साथ दिली. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार याची चर्चा होती. मात्र, भांडूप, घाटकोपर, विक्रोळी या भागातील मराठी मते ठाकरेंचे उमेदवार संजय दीना पाटी यांच्या मागे उभे राहिल्याने त्यांचा विजय सोप्पा झाला.

उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात रवींद्र वायकर यांना गोरेगाव, दिंडोशी, जोगेश्वरी या भागातील मराठी पट्ट्यात मोठे मतदान झाले. उत्तर मुंबईत मराठी मतदार विभागल्याने भाजपचे पीयूष गोयल यांचा विजय मिळाला. पियूष गोयल यांना मागाठाणे, बोरिवली गोराई, चारकोप या मराठीपट्ट्यात मोठा जनाधार मिळाला. तर मोठ्या म्हाडाच्या वसाहती आहेत. तेथील मतदारांनी काँग्रेसचे Congress भूषण पाटील यांनाही मतदान केले आहे.

दक्षिण मुंबईमध्ये शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांचे आव्हान ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या समोर होते. मात्र, मराठी भाग असलेल्या वरळी, शिवडी, भायखळा, गिरगाव या भागात मराठी मतदारांची सावंतांना साथ दिल्याने त्यांचा विजय सोपा झाला. तर, दक्षिण मध्य मुंबईत माहीम आणि वडाळा येथून आघाडी मिळाली. सायन कोळीवाडा, धारावी, चेंबूर आणि अणुशक्तीनगर येथून मराठी मतदारांची मते शिवसेनेचे अनिल देसाई यांना मिळाली.

Narendra Modi Uddhav Thackeray
Vishal Patil : काँग्रेसकडे 13 नव्हे 14 खासदार, पटोलेंना सांगलीचा 'विशाल' हात

आघाडीला एकगठ्ठा मराठी मतं

मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेमुळे ठाकरेंना, महाविकास आघाडीला फटका बसले असे चित्र निर्माण करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात मनसे आणि शिंदे गटाचा प्रभाव मुंबईत कुठेच दिसला नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील, वर्षा गायकवाड, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांना मराठी मते एकगठ्ठा मिळाली.

या भागात मराठी मतामुळे आघाडी

भांडूप, विलेपार्ले, चांदिवली, वरळी, शिवडी, भायखळा, चेंबूर, वडाळा, दिंडोशी, गोरेगाव, बोरिवली, दहिसर, कांदिवली, वांद्रे पश्चिम, वर्सोवा, मुलुंड, विक्रोळी. मराठी मतांची सर्वाधिक मतांची मदत ईशान्य मुंबईत संजय दिना पाटी, दक्षिण मुंबईत अरविंद सावंत आणि उत्तर मध्य मध्ये वर्षा गायकवाड यांना झाली असल्याचे दिसून येत आहे.

(Edited By Roshan More)

Narendra Modi Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : फडणवीसांना सरकारमधून पक्षश्रेष्ठी 'मोकळे' करणार? दिल्लीत हालचालींना वेग

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com