Lok Sabha Election 2024 : 'अब की बार, चार सौ पार' की 'अब की बार काँग्रेसचा उडणार बार'?

Loksabha Election 2024 Result Tomorrow : भाजप पुन्हा एकदा काँग्रेसला चारी मुंड्या चीत करून विजयीरथात बसणार की काँग्रेस भाजपची घोडदौड रोखत सत्ता स्थापन करणार हे काही तासांतच कळणार...
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama

'अब की पार चार सौ पार' चा नारा देत भाजपप्रणित 'एनडीए'नं लोकसभा निवडणुकीचा पारा चढवला पण काँग्रेसप्रणित 'इंडिया आघाडी'नही लोकसभेचा किल्ला निकरानं लढवला. भाजपनं आपला वारू चौखुर उधळला तर काँग्रेसनंही आपला प्रचाररथ सर्वत्र मिरवला. आता भाजप पुन्हा एकदा काँग्रेसला (Congress) चारी मुंड्या चीत करून विजयीरथात बसणार की काँग्रेस भाजपची घोडदौड रोखत सत्ता स्थापन करणार हे काही तासांतच कळणार...

2014 पासून 2024 पर्यंत म्हणजे गेली दहा वर्षे भाजप देशावर राज्य करतय. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यापासून कुणीच रोखू शकत नाही अशा आविर्भवात मिरवणाऱ्या भाजपला 'एक्झिट पोल'नं मात्र चांगलाच दणका दिला. भाजप यावेळेला सत्तेतून पायउतार होणार अशी धोक्याची घंटा कैक 'एक्झिट पोल' आणि राजकीय विश्लेषकांनी वाजवली आणि तिकडं दिल्लीच्या तख्ताला हादरे बसले. भाजपला बहुताची 'मॅजिक फिगर'ही गाठता येणार नाही , इंडिया आघाडी बहुमताच्या जवळ जाईल किंवा तो जादुई आकडा गाठेलही, अशा शक्यता वर्तवल्या जाऊ लागल्या.

प्रचारात काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी भाजपचे धिंडवडे काढण्यास सुरूवात केल्यावर तर भाजप पूर्णपणे बिथरली आणि थेट काँग्रेसच्या (Congress) अंगावर धावून गेली. काँग्रेस देशात सत्तेवर आल्यास देशाचं कसं वाटोळं होईल याचा आलाप गाऊ लागली. चर्चासत्र, शिबिरात चर्चिला जाणारा संविधान बदलाचा मुद्दा राजकीय प्रचारकीचा मुद्दा बनू शकतो, हे या निवडणुकीत (Election) पहिल्यांदाच दिसून आलं.

Rahul Gandhi
Amol kolhe Vs Shivajirao Adhalrao Patil : आढळराव-पाटलांचा उताविळपणा कोल्हेंना दुसऱ्यांदा दिल्लीत पाठविणार?

अखेर प्रचार संपला, मतदानाचा शेवटचा टप्पाही पार पडला, 'एक्झिट पोल'कडून अंदाजही बांधला गेला आता प्रतीक्षा निकालाची... 'मैदान-ए-जंग' कोण जिंकणार? 'अब की बार, चार सौ पार' फुसका बार ठरणार की 'अब की बार काँग्रेसचा धुव्वा उडणार, याचं उत्तर अवघ्या काही तासांत मिळणार! निकाल काय लागणार? कोण हरणार कोण जिंकणार? सरकारमा वेबसाइटवर सविस्तर वाचा आणि उद्या 4 जून रोजी सकाळी 7 वाजल्यापासून LIVE पाहा आणि ऐका फक्त सरकारनामा डिजिटल चॅनेलवर! सरकारनामा वेबसाइट आणि सरकारनामा डिजिटल चॅनेलला फॉलो करा.

Rahul Gandhi
Lok Sabha Election 2024 : फडणवीसांची फोडाफोडी, शिंदेंची पळवापळवी, दादांची सरशी अन् साहेबांची बाजी! ; फैसला 20 तासांनी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com