Lok Sabha Election 2024 : फडणवीसांची फोडाफोडी, शिंदेंची पळवापळवी, दादांची सरशी अन् साहेबांची बाजी! ; फैसला 20 तासांनी

Sarkarnama Analysis : सत्तापट बदलला गेला जुना खेळाडू दूर सारत नवा भिडू बसवला गेला, नवे सवंगडी नवं राज्य स्थापन झालं आणि मग सुरू झाला सत्ता नाट्याचा नवा राजकीय अंक.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 Sarkarnama

गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातली सत्तास्पर्धा इतकी टोकाला गेली की, ती हमरीतुमरीपर्यंत तर पोचलीच पण पुढं एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेक करण्यापासून फोडाफोडीपर्यंत जाऊन घसरली. जवळपास चार-साडेचार डझन आमदार पळवले गेले. सत्तापट बदलला गेला जुना खेळाडू दूर सारत नवा भिडू बसवला गेला, नवे सवंगडी नवं राज्य स्थापन झालं आणि मग सुरू झाला सत्ता नाट्याचा नवा राजकीय अंक

ठाकरेंना सत्ताखुर्चीवरून खाली खेचण्यात आलं, त्याजागी शिंदेंना बसवण्यात आलं, शेजारी फडणवीस बसले होतेच. पण भरीस भर म्हणून की काय अजितदादांनाही जवळ करण्यात आलं. अखेर महाराष्ट्रात नवा सत्तापट उभा राहिला आणि सुरू झाला सत्ताखुर्चीच्या खुंटा बळकटी करणाचा नवा डाव...

महाराष्ट्रात हे पक्ष फोडाफोडीचं राजकारण का खेळलं गेलं? ठाकरेंना दूर सारून शिंदे-अजितदादांना का जवळ केलं गेलं? या प्रश्नांचं उत्तर एकच होतं. दिल्लीतील मोदी-शाह यांना बळकट करणं! आगामी लोकसभा निवडणूक जिंकायची असेल, दिल्लीत पुन्हा एकदा मोदी-शाह यांचं सरकार बसवायचं असेल तर हा खेळ खेळावाच लागणार होता. हे भाजपच्या 'थिंक टँक'नं आधीच हेरलं होतं. या खेळाचा दिल्लीत तयार झालेला फायनल ड्राफ्ट महाराष्ट्रात पाठवला गेला आणि फडणवीसांनी तो तंतोतंत अमलात आणला.

अखेर लोकसभा निवडणूक लागली, प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली पण महामुकाबल्याचा महानिकाल लागण्याआधीच 'एक्झिट पोल'नं वर्तवलेल्या अंदाजातून भाजपनं रचलेल्या या नव्या राजकीय डावाची पुरती हवाच निघाली. भाजपनं टाकलेला डाव भाजपवरच उलटून पडतोय की काय अशी शक्यता दिसू लागली.

अवसान गळालेल्या ठाकरेंनी पायाला भिंगरी बांधून प्रचार केला. तर पक्षफुटीनंतर तसूभरही न डगमगता शरद पवारांनी (Sharad Pawar) आपल्या राजकीय अनुभवाची ताकद पणाला लावली. प्रचार संपला, मतदान झालं आता निकाल... निकाल नव्हे हा तर महानिकाल!

Lok Sabha Election 2024
Aurangabad Lok Sabha Constituency : भुमरेंना एकनाथ महाराजांचा आशीर्वाद मिळणार का ?

कोण विजयी होणार, कोण पराभूत होणार? जय-पराजयामागं कुणाचा अदृश्य हात काम करताना दिसणार? कुणी टाकले डाव-प्रतिडाव, कुणी केले हल्ले-प्रतिहल्ले? राज्यातील सत्तास्पर्धेचा पट कोण जिंकणार? हे सर्व सरकारमा वेबसाइटवर सविस्तर वाचा आणि उद्या 4 जून रोजी सकाळी 7 वाजल्यापासून LIVE पाहा आणि ऐका फक्त सरकारनामा डिजिटल चॅनेलवर! सरकारनामा वेबसाइट (Sarkarnama) आणि सरकारनामा डिजिटल चॅनेलला फॉलो करा.

Lok Sabha Election 2024
Sujay Vikhe Vs Nilesh Lanke : नगरमध्ये विखेंच्या 1991 च्या पराभवाचीच चर्चा; पवारसाहेबांचा पठ्ठया लंके ठरणार जायंट किलर?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com