Kolaour Lok Sabha : लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी, काँग्रेसकडून उमेदवार शाहू महाराज छत्रपती विरुद्ध महायुती शिवसेना शिंदे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांच्यात लढत झाली. 4 जून रोजी या दोघांचेही भवितव्य समोर येणार आहे. मंडलिक यांचे वडील गेल्या 4 टर्म खासदार असताना त्यांनी चंदगड राधानगरी आणि कागल विधानसभा मतदारसंघात ठेवलेला संपर्क हा खासदार संजय मंडलिक यांच्या पथ्यावर पडणार का? या मतदारसंघातील करिष्मा संजय मंडलिक यांना विजयापर्यंत नेणार का? याची चर्चा सध्या रंगू लागली आहे.
कागल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघात खासदार संजय मंडलिक Sanjay Mandlik यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या दोन्ही मतदारसंघात त्यांना अधिक मताधिक्य मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कागल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे नेत्यांची फौज असल्याने या दोन्ही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना अधिक मत मिळतील असा अंदाज आहे.
कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसने Congress शाहू छत्रपती यांच्या रूपाने दिलेला चेहरा ही इंडिया आघाडीची एक जागा वाढवू शकते, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात तीन विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार काँग्रेसचे आहेत. कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर उत्तर आणि करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत.
करवीरचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील, कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील, सतेज पाटील, कोल्हापूर उत्तरमधून जयश्री जाधव यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी विशेष मेहनत घेतली आहे. इतकेच नव्हे तर राधानगरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचा गड पोखरून तेथील मतदारांना काँग्रेसकडे वळवण्याचा प्रयत्न झाला आहे. लोकसभा मतदार संघातील या तीन विधानसभा मतदारसंघात शाहू महाराज छत्रपती यांना मोठे मताधिक्य मिळू शकते.
राज्यातील सत्ता बदलानंतर शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी शिवसेना शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मतदार संघातील कमी जनसंपर्क, कार्यपद्धतीवर नाराजी अशा गोष्टींचा सामना संजय मंडलिक यांना करावा लागला आहे. शिवाय महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती असल्याने लोकांनी राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज म्हणून त्यांना अधिक पसंती दिलेली दिसते.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील कागल, चंदगड, करवीर, कोल्हापूर दक्षिण या चारच मतदारसंघावर महाविकास आणि महायुतीच्या उमेदवाराचे भवितव्य निश्चित मानले जाते. करवीर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अधिक बळ असल्याने त्या ठिकाणी मताधिक्य देण्यासाठी आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील आणि दिवंगत आमदार पी एन पाटील यांनी विशेष मेहनत घेतली आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.