Gautami Patil Program : महादेव जानकरांच्या कार्यकर्त्याचा नाद खुळा....गौतमी पाटलाच्या कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी मोजले ५ लाख...!

कार्यक्रमात राडा होऊ नये, यासाठी १०० पोलीस कर्मचारी आणि सहा अधिकारी अशा एकूण १०६ पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता.
Gautami Patil
Gautami PatilSarkarnama

सांगोला (जि. सोलापूर) : माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस सोमा मोटे यांनी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचा पुरा नाद केला. हुल्लडबाज तरुणांमुळे गौतमीच्या यापूर्वीच्या कार्यक्रमात अनकेदा गोंधळ झालेला आहे. पूर्वानुभव लक्षात घेऊन मोटे यांनी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमासाठी चक्क पाच लाख मोजले आणि १०६ पोलिस बंदोबस्तासाठी आणले. फक्त बंदोबस्तासाठी पाच लाख मोजत कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडला. पण, जानकर यांच्या कार्यकर्त्यांच्या या गोष्टीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात हेात आहे. (Mahadev Jankar's Activist counted five lakhs for the settlement of Gautami Patil's program)

राष्ट्रीय समाज पक्षाचे (Rsp) सरचिटणीस सोमा मोटे यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त सांगोला (Sangola) तालुक्यातील घेरडी येथे गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गौतमी पाटील हिची तारखी मिळाली तरी गर्दीवर नियंत्रण राखून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आव्हान आयोजकांपुढे होते. कारण, गौतमी पाटील हिच्या यापूर्वीच्या अनेक कार्यक्रमात हुल्लडबाज तरुणांनी गोंधळ घातला होता. अनेक ठिकाणी राडा झाला होता. काही ठिकाणी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला होता. काही ठिकाणच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत.

Gautami Patil
Solapur Politic's : सोलापूर भाजपच्या माजी शहराध्यक्षाचा काँग्रेसमध्ये प्रवेश

कोणताही अनुचित प्रकार घडू न देता गौतमी पाटील हिचा कार्यक्रम करायचा, असा इरादा मोटे यांनी केला हेाता. त्यासाठी सोमा मोटे यांनी पोलिस बंदोबस्तासाठी सांगोल पोलिस ठाण्यात अर्ज दाखल केला. कार्यक्रमात राडा होऊ नये, यासाठी १०० पोलीस कर्मचारी आणि सहा अधिकारी अशा एकूण १०६ पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता. त्या पोटी मोटी यांनी पोलिस ठाण्यात पाच लाख रुपये मोजले.

Gautami Patil
Solapur News : काँग्रेसच्या मेळाव्यात नाराजीनाट्य : जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील कार्यक्रम सोडून निघून गेले…

कार्यक्रमापेक्षा बंदोबस्तासाठी मोजली अधिकची रक्कम

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी ही राज्यात चर्चेचा विषय असते. गौतमी हिच्या कार्यक्रमासाठी तब्बल १०६ पोलिसांचा बंदोबस्त घेतल्याने घेरडी गावाला अक्षरशः पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. पोलिस बंदोबस्तासाठी कार्यक्रमापेक्षा अधिक रक्कम मोजल्याने घेरडी येथील गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची संपूर्ण राज्यभर चर्चा रंगली आहे. त्यामुळे सोमा मोटे यांनी 'नाद केला, पण वाया नाही, गेला अशी चर्चा सध्या सुरू आहे.

Gautami Patil
Solapur Congress News : तुम्ही जबाबदारी घ्या; सुशीलकुमार शिंदे लोकसभेला उभे राहतील : पटोलेंचा काँग्रेस कार्यकर्त्यांना आदेश

आयोजकांनी पैसे भरून बंदोबस्त घेतला : कुलकर्णी

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाठी आयोजकाने पोलिस बंदोबस्त मागितला होता. त्यापोटी त्यांनी ४ लाख ७५ हजार रुपयेही भरले, त्यातून कार्यक्रमासाठी १०६ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता, असे सांगोल्याचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com