Maharashtra Administration : शिफारस पत्रांशिवाय बदली नाहीच !

Maharashtra Administration No transfer : बदल्यांमध्ये होणारा राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणांत असतो. त्यामुळेच बदल्यांसाठी आमदारांच्या शिफारस पत्रांचा धुरळा कायमचा उडत असतो.
Maharashtra Administration
Maharashtra AdministrationSarkarnama
Published on
Updated on

राज्यभरात लाखोंच्या संख्येने राज्य शासनाच्या विविध विभागात प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी काम करतात मात्र सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्या कायमच चर्चेत राहिलेल्या आहेत. त्यातल्या त्यात विशेषतः या बदल्यांमध्ये होणारा राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणांत असतो. त्यामुळेच बदल्यांसाठी आमदारांच्या शिफारस पत्रांचा धुरळा कायमचा उडत असतो.

अनेक प्रशासकीय अधिकारी मोक्याच्या जागा मिळवण्यासाठी संबधित आमदारांची बऱ्याच वर्षापासून सलगी करत असतात त्यामुळेच अधिकाऱ्यांना ती सलगी आपली बदली करून घेण्यासाठी कामाला येते. आज राज्यभरात आमदाराच्या शिफारसपत्राशिवाय एकही बदली होत नाही असे चित्र आहे. त्यामुळे बदल्यांमध्ये शिफारस पत्रांचे अतोनात महत्व आहे.

Maharashtra Administration
Female Chief Minister : राज्यात महिला मुख्यमंत्र्यांची चर्चा, ती पुढे सरकणार की पुन्हा खुंटणार?

बदल्यांसाठी असे कोणत्याही आमदारांचे शिफारस पत्र पाहिजे असे कुठल्याच नियमामध्ये कुठेच नाही. मात्र मंत्री कार्यालय या शिफारसी पत्रांची प्रथा पडलीय असं म्हणतय... मंत्री कार्यालयासाठी बदल्यांचा महिना म्हणजे एखादा सणवारच. या बदल्यांच्या दिवसांत मंत्री कार्यालयात नुसती पळापळ असते.

Maharashtra Administration
Devendra Fadnavis: संभ्रमित कार्यकर्त्यांना दिशा देण्याचे मोठे आव्हान

विशेषत या बदल्यांमध्ये मंत्र्यांचे पीए (स्वीय सहाय्यक) यांचा शब्द खूप मानाचा असतो. त्यांच्याकडे बदलीसाठी कोणीही गेला तरी ते त्या अधिकाऱ्यांनी या अमुक आमदारांचे पत्र घेऊन या तरच आपण पुढचे पाहू असे सांगतात त्यामुळे नाइलाजाने त्या संबधित अधिकाऱ्याला आमदारांच्या पत्रासाठी धावपळ करावी लागते.


अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क - ९८८१५९८८१५

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com