Maharashtra Politics : लोकसभेतून विधानसभेकडे! 'मविआ'ची आघाडी; पण भाजपच मोठा पक्ष

Mahayuti Vs MVA : लोकसभेचे निकाल पाहता युतीची अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. तर महाविकास आघाडीला अनेक ठिकाणी मताधिक्य मिळाले. त्यानुसार मविआला राज्यात आमचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला फक्त 17 जागा मिळाल्याने मोठा धक्का बसला आहे. तर महाविकास आघाडीने तब्बल 31 जागा जिंकल्या आहेत.

लोकसभेच्या या निकालाच्या जोरावर महाविकास आघाडीला विधानसभेतही मोठा विजय मिळेल, असा कॉन्फिडन्स आहे. मात्र मतदानानुसार आम्हीच सत्ता राखू असा, दावा महायुतीचे नेते करताना दिसत आहेत.

लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मताधिक्यावरून राज्यात सत्तांतर होणार असल्याची चर्चा आहे. सध्या महायुती सरकारकडे 200 हून अधिक आमदार आहेत. मात्र लोकसभेचे निकाल पाहता युतीची अनेक ठिकाणी पडझड झाल्याचे दिसून येते. त्यानुसार महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आगामी विधानसभेत आमचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

लोकसभेतील विधानसभा मतदारसंघातील चित्र

आघडीतील काँग्रेसकडे आता 44 आमदार असून लोकसभेत त्यांना 63 विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली आहे. उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या शिवसेनेडे 16 आमदार असून ते 58 ठिकाणी आघाडीवर आहेत. तर शरद पवार गटाचे 12 आमदार असून त्यांनी 34 विधानसभा मतदारसंघांत मुसंडी मारलेली आहे.

महायुतीमधील भाजप या मोठ्या पक्षाकडे 106 आमदार आहेत. लोकसभेत भाजपला 79 विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली. शिंदे गटाचे 40 आमदार असून ते 41 ठिकाणी आघाडीवर आहेत. तर 40 आमदार असलेल्या अजित पवार गटाने 5 ठिकाणी आघाडी घेतल्याचे दिसून आले.

Maharashtra Politics
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचे भाषण संपताच 'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणा; बारामतीत नेमकं काय घडलं?

या आकड्यांनुसार महाविकास आघाडीला तब्बल 155 विधानसभा मतदारसंघात निर्विवाद आघाडी मिळत असल्याचे दिसून येते. तर महायुतीतील घटक पक्षांना 125 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुकीतील या गणितानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी बाजी मारणार असल्याची चर्चा आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्यासह इतर नेत्यांनी आम्हीच सत्ता राखणार असल्याचा विश्वास वारंवार व्यक्त केला आहे.

मतदानाचा आकडा काय सांगतो?

लोकसभा निवडणुकीतील विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी दिसत असली तरी महायुतीच्या मतसंख्येत मात्र जास्त फरक पडला नसल्याचा दावा फडणवीसांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या या विजयाला फडणवीसांनी डकवर्थ लुईसची उपमा दिली आहे. आघाडीला महायुतीपेक्षा फक्त अडीच लाख मते जास्त मिळाल्याचे फडणवीसांनी सांगितले.

भाजप मोठा पक्ष

लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त 79 विधानसभा मतदारसंघात भाजपने सरशी मारल्याचे दिसते. त्याखालोखाल काँग्रेस 63, ठाकरे गट 58, शिंदे गट 41, शरद पवार गट 34 तर अजित पवार गट 5 जागांवर पुढे असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्यात पहिल्या क्रमांचा पक्ष भाजप तर दुसऱ्या क्रमांवर काँग्रेस राहणार असल्याचे दिसते.

Maharashtra Politics
Ajit Pawar Baramati Rally : ...तरच लाडकी बहीण योजना सुरू राहील; अजितदादांचा इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com