Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचे भाषण संपताच 'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणा; बारामतीत नेमकं काय घडलं?

Maratha Vs OBC Reservation : बारामती अजित पवार गटाचा जनसन्मान महामेळावा पार पडला. या सभेत बोलताना भुजबळांचे नाव न घेता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली.
Baramati NCP Sabha
Baramati NCP SabhaSarkarnama
Published on
Updated on

Baramati Political News : राज्यात आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र निर्माण झाले आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास ओबीसी नेते छगन भुजबळांचा मोठा विरोध आहे. त्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील भुजबळांवर सडकून टीका करताना दिसतात. आता याचे पडसाद बारामतीतही पाहायला मिळाले.

बारामती अजित पवार गटाचा जनसन्मान महामेळावा पार पडला. या सभेत बोलताना भुजबळांचे नाव न घेता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यानंतर भुजबळांचे भाषण संपताच उपस्थितांतून एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

भुजबळांनी Chhagan Bhujbal मराठा आरक्षणाला आपण अनुकूल असल्याचे स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची भूमिका पहिल्यापासून आहे. आरक्षण देताना मात्र इतर समाजाला त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, ऐवढी माफक अपेक्षा आहे, अशी भूमिकाही भुजबळांनी बारामतीत मांडली. मात्र मराठा आरक्षणासाठी आयोजित केलेल्या सर्व पक्षीय बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार घातल्याचे सांगत भुजबळांनी नाव न घेता पवारांवर तोफ डागली.

भुजबळ म्हणाले, राज्यात दोन समाज आमने सामने असताना त्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. त्यासाठी मुख्यमंत्री शिंदेच्या नेतृत्वात बैठकीचे आयोजन केले होते. त्याला विरोधक येणार होते. ज्येष्ठ नेते म्हणून त्याला शरद पवारांनीही Sharad Pawar उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र बारामतीतून फोन आला आणि ऐनवेळी विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार घातला. विरोधकांना दोन्ही समाजातील वाद पेटता ठेवायचा आहे, अशी टीका भुजबळांनी केली.

Baramati NCP Sabha
Ajit Pawar Baramati Rally : ...तरच लाडकी बहीण योजना सुरू राहील; अजितदादांचा इशारा

या मेळाव्यात भुजबळांना मानाचे पान दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांनंतर भुजबळांचे शेवटचे भाषण झाले. या भाषणातून भुजबळांनी विरोधकांचा सडकून समाचार घेतला. आरक्षणाबाबत भूमिकाही स्पष्ट केली. असे असले तरी भुजबळांचे भाषण संपताच सभेला उपस्थित लोकांनी एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे काही वेळ सभास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Baramati NCP Sabha
Marathwada Political News : 'पाऊले चालती पंढरीची वाट', राजकीय नेत्यांना आस विठुरायाची

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com