Congress News: काँग्रेसचा बालेकिल्ला मराठवाडा भाजप अन् शिवसेनेकडे कसा झुकला?

Marathwada Congress Politics: मराठवाड्याचा विचार करताना प्रदेश काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. काही काळ कम्युनिस्ट आणि शेतकरी कामगार पक्षाची चलती होती.
Marathwada Congress Politics
Marathwada Congress PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Congress Politics

लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Constituency 2024) पडघम वाजू लागले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची धुळवडही सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत तारखा घोषित होऊन आचारसंहिताही लागेल. बीडसह मराठवाड्याचा (Marathwada) विचार करताना प्रदेश काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला राहिलेला आहे.

परभणी आणि बीड जिल्ह्यात काही काळ कम्युनिस्ट आणि शेतकरी कामगार पक्षाची चलती होती. परंतु बदलत्या काळानुसार सारीच समीकरणे बदलून गेली. त्याकाळी काँग्रेसने दगड उभा केला तरी विजयाची खात्री होती. बैलजोडी हे काँग्रेसचे चिन्ह पाहिले की मतांचा पाऊस पडायचा. पंतप्रधान पंडित नेहरू यांचे जनतेमध्ये जबरदस्त आकर्षण होते. बीडचे पहिले खासदार रखमाजी गावडे आष्टी तालुक्यातील होते. नेहरुंना पाहिल्यावर गावडे यांना आनंदाश्रू आले होते, असे सांगितले जाते. गावडे यांनी पाच वर्ष खासदारकी भोगूनही त्यांच्याकडे काहीच नव्हते.

परभणीत शेकापचे शेषराव गव्हाणे यांना खासदारकीची संधी मिळाली होती. बाबासाहेब परांजपे, रफिक झकेरिया यांनी औरंगाबाद मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांच्या काळात या मतदारसंघात अनेक विकासकामे झाली. परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर या मतदारसंघातही काँग्रेस विरोधकांना संधी मिळाली. नांदेडमध्ये आणीबाणीनंतर जनता दलाचे डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्या नंतरच्या काळात शेकापचे केशवराव धोंडगे यांना संधी मिळाली होती. मराठवाड्यातील मतदार सुज्ञ आणि मोठ्या मनाचा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बीड मतदारसंघात सातारचे क्रांतिसिंह नाना पाटील आणि बबनराव ढाकणे यांनाही निवडून दिले होते. काँग्रेसवर प्रेम करणारा मराठवाडा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडे कसा झुकला हे काँग्रेसवाल्यांच्या लक्षात यायला फार उशीर लागला. पक्ष आणि विचारनिष्ठा गुंडाळून कोणी कोठेही जाऊ लागले.

राजकारणाचे स्वरुप बदलले. 'वरून कीर्तन आतून तमाशा' ही नीती जोर धरू लागली. दिवसा काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसणारे नेते रात्री विरोधकांशी गुफ्तगू करण्यात मश्गुल असत. या साऱ्या प्रकारांमुळे विरोधी पक्षाचा उदय झाला. आज काँग्रेस कोठे आहे ते शोधावे लागते. सरत्या लोकसभेत महाराष्ट्रातील अवघा एक खासदार होता ते म्हणजे चंद्रपूरचे बाळू धानोरकर. धानोरकर तसे मुळचे शिवसैनिक होते.

Marathwada Congress Politics
Raju Patil Vs Shrikant Shinde: निवडून यायचं असेल तर त्यांनी सावरून घ्यायला पाहिजे; पाटलांचा शिंदेंना खोचक सल्ला

शाखा प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा त्यांचा शिवसेनेत प्रवास झाला होता. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत लोकसभा निवडणूक लढवली आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री भाजप नेते हंसराज अहिर यांचा त्यांनी पराभव केला होता. परंतु, धानोरकर यांचे अकाली निधन झाले. अशोकराव चव्हाण यांनी परंपरागत पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे काँग्रेसचे कट्टर आणि निष्ठावंत नेते होते. आता सारेच भाजपच्या हातात हात घालून सत्ता संपादनासाठी धडपडत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com