देवेंद्र फडणवीसांनी करुन दाखवलं : महाविकास आघाडीवर पुन्हा जोरदार मात

Devendra Fadnavis | BJP | Congress | Mahavikas Aaghadi : काँँग्रेसच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे पराभूत
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
Devendra Fadnavis-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ पुन्हा एकदा चमत्कार घडवून विधान परिषद निवडणुकीतही अशक्यप्राय वाटणारा विजय खेचून आणला आहे. या निवडणूक निकालात भाजपचे (BJP) पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) पराभूत झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला त्यातही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. (MLC Election 2022 Latest Marathi News)

या विजयानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही राज्यसभा निवडणुकीत १२३ मत घेतली होती. या निवडणुकीत आपण १३४ मत घेतली आहेत. मी सुरुवातीपासूनच सांगत होतो की महाविकास आघाडीमध्ये प्रचंड नाराजी आहे. समन्वय नाही, सरकारवर आमदारांचा विश्वास नाही. त्यामुळे आपल्या सद्सदविकेक बुद्धीला स्मरुण आमच्या पाचव्या उमेदवाराला आमदार मत देतील असा आम्हाला विश्वास होता, तेच पाहायला मिळाले. पाचव्या उमेदवाराकरीता आमच्याकडे एकही मत नव्हते, तरीही काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपेक्षा आमच्या पाचव्या उमेदवाराने जास्त मत घेतली. (MLC Election 2022 Latest Marathi News)

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
काँग्रेसवर मोठी नामुष्की : पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे पराभूत

देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या विजयानंतरही आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांचे स्मरण केले. हे दोन्ही सहकारी इतक्या अडचणीत याठिकाणी आले, आणि त्यांनी विजयाला हातभार लावला, असे म्हणतं त्यांनी टिळक आणि जगताप यांचे आभार मानले. ते पुढे म्हणाले, या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये एक नवी परिवर्तनाची नांदी आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच कुठेतरी या सरकारबद्दलचा असंतोष बाहेर आला आहे, यापुढे आमचा संघर्ष असाच सुरु राहिल आणि लोकाभिमुख सरकार आल्यानंतरच तो थांबेल असे म्हणतं महाविकास आघाडी सरकारला इशाराही दिला.

पहिल्या फेरीत भाजपचे ४, राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि शिवसेनेचे २ उमेदवार विजयी :

विधान परिषद निकालात पहिल्या फेरीत अक्षेप्रमाणे भाजपचे ४, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) २ शिवसेनेचे (Shivsena) २ उमेदवार विजयी झाले. पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे हे विजयी झाले. तर शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे विजयी झाले. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेही विजयी झाले.

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
फडणवीसांचा पुन्हा चमत्कार : 'मविआ'ची २० मत फोडत प्रसाद लाड महाडिकांच्या मार्गावर

पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर यांना २९, राम शिंदे यांना ३०, श्रीकांत भारतीय यांना ३० आणि उमा खापरे यांना २७ मत मिळवत विजय नोंदवला. तर शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांनाही प्रत्येकी २६ मत मिळाली. यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनीही पहिल्याच फेरीत विजयाच्या २६ मतांचा कोटा पूर्ण केला. रामराजे शिंदे यांचे एक मत बाद ठरुनही त्यांना पहिल्या पसंतीची २८ मत मिळाली. तर खडसे यांना २९ मत मिळाली.

काँग्रेसची ३ मत फुटली :

काँग्रेसची ३ मत फुटल्याने त्यांचा पहिल्या फेरीत एकही उमेदवार विजयी होवू शकला नव्हता. पहिल्या फेरीत काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना २२ मत मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार भाई जगताप यांना पहिल्या पसंतीची १९ मत मिळाली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मतपत्रिकेवर भाई जगताप यांना दुसरा पसंती क्रम असल्याने मतमोजणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत त्यांनी आघाडी घेतली आणि विजय मिळवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com