
11 Key Achievements Under Modi Government : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला या महिन्यात ११ वर्षे पूर्ण होत आहेत. २०१४मध्ये प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या या सरकारने २०१९ व २०१४मध्ये जबरदस्त पुनरागमनही केले. तर या ११ वर्षांच्या सरकारने अनेक आघाड्यांवर काम केले, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र पूर्णपणे पालटले आहे. यामध्ये सर्वाधिक योगदान देणार या सरकारची ११ कामं कोणतही हे आपण पाहूयात.
मोदी सरकारने अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केलेल्या कामामुळे आज भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे आणि लवकरच तिसऱ्या स्थानवरही झेप घेणार आहे. मोदी सरकारच्या या यशात ही ११ कामेही महत्त्वपूर्ण योगदान देताना दिसत आहे.
१) पंतप्रधान मोदी सरकारने ११ वर्षांत पायाभूत सुविधांवर सर्वाधिक भर दिला. राष्ट्रीय महामार्गांची लांबी मोठ्याप्रमाणात वाढली आहे, शिवाय सरकारने रस्ते वाहतूक व महामार्ग बजेट तब्बल ५७० टक्क्यांनी वाढवले आहे.
२)मागील अकरा वर्षांत केवळ रस्त्यांचीच कामे झाली नाहीत, तर रेल्वे मार्गांचाही विस्तार झाला. बहुतांश रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले. नुकतंच पंतप्रधान मोदींनी चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन केल्याने देश काश्मीर ते कन्याकुमीरपर्यंत रेल्वेने जोडला गेला. शिवाय, अमृत भारत स्टेशन योजना आण सर्वात महत्वाचे जागतिक दर्जाच्या १३६ वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात आल्या यामुळे रेल्वे सुविधांचा दर्जा वाढला व प्रवासी संख्येत फायदा झाला.
३)शहरी वाहतूक सुधारण्यासाठी, सरकारने मेट्रो सेवा २३ शहरांपर्यंत वाढवली, जी आधी केवळ पाच शहरांपर्यंत मर्यादित होती. आता देशातील मेट्रो नेटवर्क एक हजार किलोमीटर पेक्षाही जास्त झाले आहे.
४)मोदी सरकारने देशात विमानतळांची संख्या ७४ वरून १६० वर नेली आहे. यामुळे हवाई प्रवासाचा विस्तार झाला. उडान योजने अंतर्गत सवलतीच्या दरात दीड कोटींहून अधिक नागरिकांना स्वस्त दरात विमान प्रवास करण्याची संधी मिळाली.
५)जमीन व आकाशानंतर अंतराळातही सरकारने दमदार कामगिरी केली. इस्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर सॉफ्ट लँड करून इतिहास रचला. कारण, ही कामगिरी करणारा भारत जगातील पहिला देश ठरला. भारताने अंतराळ व्यवस्था खुली केली व आता या क्षेत्रात २०० पेक्षा जास्त स्टार्टअप्स काम करत आहेत.
६)जलमार्गांवरही चांगले काम झाले, देशात पहिली जलम मेट्रो केरळमध्ये सुरू झाली. वाराणसी आणि हल्दिया दरम्या एक अंतर्देशीय जलमार्ग बांधण्यात आला. देशात बंदारांचाही मोठा विकास झाला.
७)याशिवाय मोदी सरकारेने शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी भरघोस काम केले. किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमांतून देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू लागली. पिकाच्या किमान आधारभूत किमतीत तब्बल १५० टक्क्यांनी वाढ झाली. तर, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत १.७५ लाखे कोटी रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले.
८)महिला सक्षमीकरणासाठी सरकारने ९० लाख बचत गटांची स्थापन केली. १० कोटी महिलांना मुद्रा कर्जाचा लाभ मिळाला. महिलाच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी १२ कोटी शौचालये बांधली गेली व दहा कोटी कुटुंबाना उज्ज्वला एलपीजी कनेक्शनचा लाभ मिळाला. तर १५ कोटींहून अधिक घरांमध्ये थेट नळाचे पाणी पोहचले.
९)उद्योगांना चालना देण्यासाठी सरकारने ५२ कोटीहून अधिक मुद्रा कर्ज वाटप केले. देशभरात १.६ लाख स्टार्टअप्सची स्थापना, दीड कोटींहून अधिक तरूणांचे कौशल्य विकास, ४९० नवीन विद्यापीठं व आठ हजारांहून अधिक नवी महाविद्यालयं सुरू केली गेली.तर पीएलआय योजनेमुळे भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फोन उत्पादक देश बनला. त्यात महत्तावंच मोदींनी मेक इन इंडिया हा मंत्र देत स्वदेशी उत्पादन वाढवण्याचे आवाहन केले.
१०)देशाच्या संरक्षण क्षेत्रातीह मागील ११ वर्षांत दमदार कामगिरी झाली. ज्याची प्रचिती नुकतीच भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षात अवघ्या जगाला आली. आयएनएस विक्रांत विमानवाहू जहाजे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. देशाची संरक्षण निर्यात ३३ पटीने वाढली आहे.
११)अर्थव्यवस्थेला आघाडीवर नेण्यासोबतच मोदी सरकारने मागील अकरा वर्षांत कला आणि संस्कृतीलाही नवीन आयाम देण्याचे काम केले. मोदी सरकारच्या आतापर्यंत कार्यकाळात अयोध्येतेतील ऐतिहासिक श्रीराम जन्मभूमीवर मंदिर निर्माण झाले. काशी विश्वनाथ ते उज्जैन महाकालेश्वर पर्यंत कॉरिडॉर विकसित केला गेला. जी-२० यजमानपदामुळे भारतीय संस्कृती जगभरात पोहचली. देशातून चोरीला गेलेल्या अमूल्य अशा सहापेक्षाही अधिक कलाकृती भारताने परत आणल्या आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.