India Vs Pakistan : जागतिक बँकेनेच फाडला भिकेला लागलेल्या पाकिस्तानचा बुरखा; भारताला ‘अच्छे दिन’...

World Bank Report Reveals Pakistan’s Poverty Levels : जागतिक बँकेच्या अहवालानुसार, पाकिस्तानमधील एकूण लोकसंख्येच्या तब्बल ४५ टक्के लोक गरिबीत आयुष्य जगत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
India imposes a ban on Pakistani aircraft from entering its airspace, escalating diplomatic tensions between the two nations.
India imposes a ban on Pakistani aircraft from entering its airspace, escalating diplomatic tensions between the two nations. Sarkarnama
Published on
Updated on

India’s Poverty Reduction : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली. पण त्यानंतरही भारतावर आगपाखड करणाऱ्या भिकेला लागलेल्या पाकचा बुरखा आता जागतिक बँकेनेच फाडला आहे. तर भारताला अच्छे दिन आले असल्याचे बँकेच्या ताज्या अहवालात स्पष्ट झाले आहे.

जागतिक बँकेच्या अहवालानुसार, पाकिस्तानमधील एकूण लोकसंख्येच्या तब्बल ४५ टक्के लोक गरिबीत आयुष्य जगत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर त्यापैकी १६.५ टक्के लोक हे अत्यंत गरीब असल्याचेही बँकेने म्हटले आहे. यात २०२४-२५ या वर्षांत तब्बल १ कोटी ९० लाख लोकांची भर पडली आहे.

दुसरीकडे भारतासाठी सकारात्मक बातमी समोर आली आहे. मागील दशकात भारताची गरिबी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. २०११-१२ मध्ये गरिबीचा दर २७.१ टक्के होता. तो थेट ५.३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. भारतातील तब्बल १ कोटी ७१ लाख लोक २०२२-२३ पर्यंत दारिद्ररेषेच्यावर आले आहेत, असे जागतिक बँकेच्या अहवात नमूद करण्यात आले आहे.  

India imposes a ban on Pakistani aircraft from entering its airspace, escalating diplomatic tensions between the two nations.
Sarkarnama Headlines : लोकल अपघातानंतर राज ठाकरे राज्यकर्त्यांवर बरसले; म्हणाले, बोजवारा उडाला...

दरम्यान, दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान दिले जाणारा निधी किंवा अनुदान बंद करण्याच मागणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह विविध वित्तीय संस्थाकडे केली आहे. पाकिस्तानकडून या निधीचा वापर विकासाऐवजी लष्करी ताकद वाढविण्यासाठी केला जात असल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले होते. बँकेच्या अहवालामुळे आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

India imposes a ban on Pakistani aircraft from entering its airspace, escalating diplomatic tensions between the two nations.
Congress Politics : गेहलोत अन् पायलट यांचा राहुल गांधींना सुखद धक्का; भाजपचे सगळे प्लॅन फेल...

पाकिस्तानला विविध वित्तीय संस्थांकडे सातत्याने निधी दिला जातो. पण त्यानंतर लोकांचे दैनंदिन जीवनमान उंचावण्याऐवजी गरिबी अधिकच वाढत चालल्याचे स्पष्ट झाला आहे. त्यामुळे निधीचा वापर योग्यपध्दतीने होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बँकेच्या अहवालामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचा बुरखा फाटला असून भारताची ताकद दिसून आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com