Vidhansabha Election : राज्यातील 'या' मतदारसंघात सर्वाधिक तर 'या' ठिकाणी कमी उमेदवार

Political News : राज्यभरातील 288 मतदारसंघांत प्राप्त झालेल्या अर्जांच्या छाननीनंतर कुठल्या मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार, तर कुठल्या मतदारसंघात सर्वात कमी उमेदवार आहेत हे आता स्पष्ट झाले आहे.
Vidhansabha Election
Vidhansabha Election sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. सर्वच पक्षात बंडखोरी झाली असल्याने त्यांची मनधरणी करण्यासाठी नेतेमंडळींना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच राज्यभरातील 288 मतदारसंघांत प्राप्त झालेल्या अर्जांच्या छाननीनंतर कुठल्या मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार, तर कुठल्या मतदारसंघात सर्वात कमी उमेदवार आहेत हे आता स्पष्ट झाले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर छाननीची प्रक्रिया पार पडली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नांदेडच्या भोकर या मतदारसंघात एकूण 140 उमेदवार निवडणुकीसाठी पात्र ठरले आहेत. राज्यातील सर्वाधिक उमेदवार या मतदारसंघात असल्याने सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी किती जण निवडणूक रिंगणातून माघार घेणार याची उत्सुकता लागली आहे. (Vidhansabha Election News)

भोकर या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, प्रहार, एआयएमआयएम, जनता दल (सेक्युलर) या पक्षांनीही आपले उमेदवार उतरवले आहेत. भाजपतर्फे खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण विरुद्ध काँग्रेसचे (Congress) तिरुपती कदम हे उमेदवार आहेत. त्यामुळे येथील निवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे राज्यात अवघे पाच उमेदवार असलेला महाड हा सर्वांत कमी उमेदवारांचा मतदारसंघ ठरला आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांना 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. राज्यात सर्वांत कमी उमेदवार महाड या मतदारसंघात आहेत. फक्त पाच उमेदवार या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

या ठिकाणी शिवसेनेचे (Shivsena) भरत गोगावले यांच्याविरुद्ध शिवसेना (उबाठा) पक्षाच्या स्नेहल जगताप निवडणूक लढवत आहेत. मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीतर्फे आनंदराज घाडगे, बहुजन समाज पक्षातर्फे अमृता वाघमारे, प्रज्ञा खांबे या अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे केवळ पाच उमेदवार निवडणूक रिंगणात असलेल्या मतदारसंघात काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com