Ravindra Waikar Vs Amol Kirtikar : वायकरांनी मॅच जिंकली; पण 'मॅन ऑफ दी मॅच'चे मानकरी कीर्तीकर!

North West Mumbai Lok Sabha Result : सुरुवातीस वायकरांनी आघाडी घेत विजयाचा मार्ग सुकर करणार असे वाटत होते. त्यातच कीर्तीकरांनी मुसंडी मारून अडीच हजारांचे लिड घेतले. शेवटपर्यंत असेच आलटून पालटून लिड घेतले जात होते.
Amol Kirtikar, Ravindra Waikar
Amol Kirtikar, Ravindra WaikarSarkarnama

Mumbai Lok Sabha Election 2024 : T 20 चा फायनल समाना आणि शेवटच्या चेंडूवर 18 धावा काढायच्या आहेत. बॉलर एक वाईड टाकतो, दुसरा नो बॉल आणि सिक्स, तिसऱ्या फी हिटवर पुन्हा सिक्स. आता या बॉलवर काय होणार हे पाहण्यासाठी सर्वजण डोळ्यात प्राण आणतात. आणि त्या चेंडूवरही सिक्स ठोकून गमावलेली सिरीज जिंकली जाते. अशीच रोमहर्षक लढत मुंबई वायव्य लोकसभेच्या मैदानावर मंगळवारी पाहायला मिळाली. यात शिंदे गटाचे रवींद्र वायकर जिंकले असले तरी या मॅचचे खरे मानकरी ठरले ते झुंज देणारे ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर.

मुंबई उत्तर, उत्तर पूर्व, उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे निकाल चारच्या आधीच लागले. मात्र मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचा निकाल मात्र रात्री उशिरापर्यंत फायनल होत नव्हता. येथे कडवे शिवसैनिक आमनेसामने होते. आमोल कीर्तीकर हे ठाकरे गटाकडून तर रवींद्र वायकरांना शिंदे गटाने मैदानात उतरवले होते.

Amol Kirtikar, Ravindra Waikar
Amol Kirtikar, Ravindra WaikarSarkarnama

हा लोकसभेचा सामना असला तरी राज्याला या मतदारसंघाने क्रिकेटच्या T-20 चीच आठवण करून दिली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोण विजयी होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अंदाज येत नसल्याने कीर्तीकर, वायकरांसह दोन्ही गटाची धाकधूक वाढली होती. अखेर येथून वायकरांनी 48 मतांनी विजय खेचून आणला.

वायव्य म्हणजेच उत्तर पश्चिम मतदारसंघात आलटून पालटून मताधिक्य घेणाऱ्या ठाकरेंच्या अमोल कीर्तीकर आणि शिंदेंच्या रवींद्र वायकरांनी महाराष्ट्राची धडधड वाढवली. सुरुवातीस वायकरांनी आघाडी घेत विजयाचा मार्ग सुकर करणार असे वाटत होते. त्यातच कीर्तीकरांनी मुसंडी मारून अडीच हजारांचे लिड घेतले. यानंतर कीर्तीकर आणखी वरचढ ठरतील, असा अंदाज होता.

Amol Kirtikar, Ravindra Waikar
Ravindra Waikar Win : मुंबईत मोठा ट्विस्ट! रवींद्र वायकरांचं नशीब फळफळलं

आता कीर्तीकरांचा विजय पक्का झाला असे समजले जात होते. मात्र अनपेक्षितपणे वायकरांनी ते लिड कापून 48, 75, 511 ते 800 मताधिक्यांपर्यंत मजल मारली. त्यामुळे कीर्तीकरांच्या हातून विजय निसटला असे मानले जाऊ लागले. मात्र बाजी पालटत कीर्तीकरांनी वायकरांवर एका मताने आघाडी घेतले होते. यानंतर पुन्हा वायकर सरशी घेत ४८ मतांनी विजयी झाले. अशा प्रकारे T-20 ट्विस्टवर ट्विस्ट झालेल्या या मतदारसंघाने राज्याचे लक्ष वेधून घेतले.

आधी कीर्तीकर, नंतर वायकर..

दरम्यान, काही तासांपूर्वीही अमोल कीर्तीकर विजयी झाल्याच्या बातम्या माध्यमांतून झळकल्या. मात्र निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दोघांतील मतांची झुगलबंदी चांगली रंगली होती. यात दोघांचेही मतांचे आकडे मागेपुढे होत होते.

कीर्तीकरांच्या विजयाच्या बातम्या आल्यानंतर काही वेळातच वायकरांनी ४८ मतांनी आघाडी घेतली. ती आघाडी काहीवेळ तशीच होती. त्यामुळे माध्यमांनी त्यांना विजयी घोषित केले. मात्र पुन्हा कीर्तीकरांनी एका मताने आघाडी घेतली. अखेर वायकर ४८ मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले.

Amol Kirtikar, Ravindra Waikar
Latur Lok Sabha Election Result : डाॅ. काळगेंच्या रुपाने लातूरच्या गढीवर पुन्हा देशमुखांचाच झेंडा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com