Simhastha Kumbh mela : नगरविकास विभागाच्या अडून शिंदेंची कुंभमेळ्यात एंट्री; गिरीश महाजनांची अस्वस्थता वाढणार?

Simhastha Kumbh mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2027 च्या नियोजनात शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाल्याने भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून विरोधकांना अद्याप वगळण्यात आले आहे.
Girish-Mahajan-Eknath-Shinde.
Girish-Mahajan-Eknath-Shinde.Sarkarnama
Published on
Updated on

सिंहस्थ कुंभमेळा जसा जवळ येऊ लागला आहे तसा महायुतीतील नेत्यांमध्ये वादही वाढू लागला आहे. आतापर्यंत नियोजनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीतील सहकारी पक्ष आणि मंत्र्यांना जाणीवपूर्वक अलिप्त ठेवले होते. पण आता हीच गोष्ट वादाचे कारण ठरवू लागली आहे.

सिंहस्थ कुंभमेळा 2027 मध्ये होणार आहे. प्रयागराज कुंभमेळ्याचा अनुभव पाहता कुंभमेळ्याचे राजकीय श्रेय भाजप एकटा घेऊ इच्छित आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा इव्हेंट राज्य सरकारला प्रतिष्ठेचा वाटू लागला आहे. कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने पहिल्यांदाच स्वतंत्र प्राधिकरण नियुक्त केले आहे.

त्याआधी विविध शासकीय विभागांच्या नियोजनाच्या बैठका झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही बैठका प्रशासनावर एक हाती नियंत्रण राहील या दृष्टीने काम केले. पण आता याच नियोजनात शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एन्ट्री घेतली आहे. नगरविकास विभागाच्या आडून शिंदे यांनी नियोजनाची सूत्र हातात घेतली आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्यात सुरुवातीपासून गोदावरी स्वच्छता आणि प्रदूषण मुक्त करणे याला प्राधान्य देण्यात आले आहे. या निमित्ताने 1400 कोटी रूपयांच्या 3 योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. पण योजनांच्या निविदा जाणीवपूर्वक नागपूर येथील काही कंत्राटदारांना मिळाव्यात याची सोय प्रशासनाने केल्याचे आक्षेप आहेत.

Girish-Mahajan-Eknath-Shinde.
Chandrashekhar Bawankule BJP : जिल्हाध्यक्षांनी निलंबित केलेल्या पदाधिकाऱ्याला मोठी संधी? कारण त्याच्या घरी पोचले मंत्री चंद्रशेखर बावनकुळे!

हे आक्षेप विचारात घेऊन शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी महापालिकेला याबाबत आपला विरोध कळविला आहे. राज्य शासनालाही विविध तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील कामांना थेट स्थगिती देण्यापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप केला. शिंदे यांनी नगर विकास विभाग आपल्याकडे असल्याचा पुरेपूर लाभ यानिमित्ताने घेण्याचे ठरविलेले दिसते.

शिंदे यांच्या नगर विकास विभागाने गोदावरी स्वच्छतेच्या सर्व प्रकल्पांची माहिती महापालिकेकडून मागितली आहे. लवकरच उपमुख्यमंत्री शिंदे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीची बैठक मंत्रालयात घेणार असल्याची कुणकुण लागली आहे. म्हणजेच नगरविकास विभागाच्या माध्यमातून शिंदे सिंहस्थ कुंभमेळ्यात थेट एन्ट्री करण्याची शक्यता आहे.

Girish-Mahajan-Eknath-Shinde.
BJP Politics : शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल शहरप्रमुखाने मागितली राणेंची माफी, एका वर्षा पूर्वी घडली होती 'ती' घटना

या शक्यतेमुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन त्यांची अस्वस्थता वाढू लागली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे 24 हजार कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा राज्य शासनाकडे सादर झाला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत दोन ते तीन वेळा बैठका घेतल्या. बैठका घेताना जिल्ह्यातील चारही मंत्र्यांना अलिप्त ठेवले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com