पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर; रोहिणी खडसेंप्रमाणे पाऊल उचलण्याचे आवाहन

पक्षविस्तारासाठी झटणाऱ्या नेत्यांचे भाजपमध्ये पंख छाटले जातात, हे लक्षात घेऊन रोहिणी खडसे राष्ट्रवादीत आल्या. त्या पद्धतीने पंकजा मंडे यांनीही पाऊल उचलावे.
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर दिली आहे. पक्ष वाढविणाऱ्यांचे भाजपमध्ये पंख छाटले जातात, हे रोहिणी खडसे यांच्या लक्षात आले, त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्याच पद्धतीने पंकजा मुंडे यांनीही पाऊल उचलावं, असे विधान आमदार मिटकरी यांनी केले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना भाजपत डावलेले जात आहे, याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. (NCP leader offers Pankaja Munde to join the party)

जळगाव जिल्ह्यातील बोदवडमध्ये रोहिणी खडसे यांच्याकडून संवाद रॅलीचं आयोजन करण्यात आले होते. अमोल मिटकरी यांनी या संवाद यात्रेत बोलताना भाजप नेत्या पंकजा यांना थेट राष्ट्रवादीत येण्याची ऑफर देऊन टाकली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना भाजपत डावलेले जात आहे आणि त्यांच्या पक्षांतराची चर्चा पुन्हा रंगली आहे.

Pankaja Munde
‘मोदींनी मला सांगितलं होतं, गुलाब, महाराष्ट्रात सर्वांना पाणी पाज’

आमदार मिटकरी म्हणाले की, राज्यात (स्व.) गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या कष्टामुळे भारतीय जनता पक्षाचा विस्तार झालेला आहे. मात्र, त्यांच्या मुलींचा निवडणुकीत सुडाचं राजकारण करून पराभव केला आहे. खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या हा प्रकार लक्षात आला, त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. तेच पंकजाताईंच्या अजूनही लक्षात आलेले दिसत नाही. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ सदस्यांची यादीही राज्यपाल लवकरच मंजूर करण्याची शक्यता आहे, त्यातही मुंडे यांचे नाव नाही, त्यामुळे पक्ष विस्तारासाठी झटणाऱ्या नेत्यांचे भाजपमध्ये पंख छाटले जातात, हे लक्षात घेऊन रोहिणी खडसे राष्ट्रवादीत आल्या. त्या पद्धतीने पंकजा मंडे यांनीही पाऊल उचलावे, असेही आवाहनही मिटकरी यांनी केले.

Pankaja Munde
Nitin Gadkari : विहिरीत उडी घेईल, पण..; वापरा अन् फेका ही पॉलिसी चांगली नाही, गडकरी संतापले

त्यावेळी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन पहाटेचा शपथविधी केला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली नसती. औरंगजेबच्या तंबूचे कळस संताजी, धनाजीने कापले होते. मात्र, भाजपचा कळस अजित पवारांनी कधी कापला, हे त्यांनाही कळलं नाही, असा दावाही अमोल मिटकरी यांनी केला.

Pankaja Munde
‘आदिनाथ’साठी सावंतांनी ९ कोटी रुपये भरले; बारामती ॲग्रोच्या अडचणी वाढण्याची शक्यता

पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून त्यांना पक्षात डावलेले जात आहे, असा आरोप पंकजा यांच्या समर्थकांकडून होत आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारातही त्यांनी संधी मिळालेली नाही. त्यावेळी त्यांनी माझ्यापेक्षा जादा पात्रता असणाऱ्या लोकांना मंत्रीपद दिले असेल. माझी अजून तेवढी पात्रता नसेल, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले होते. तसेच, मागील विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी डावलल्याने त्यांच्या समर्थकांनी जोरदार राडा केला हेाता. तसेच मागील काही दिवसांपूर्वी बीडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना मी डावीकडे गेल्यास तुमचा पाठिंबा असेल असेही विधान केले हेाते, त्यामुळे त्यांच्या पक्षांतराबाबतच्या चर्चा पुन्हा पुन्हा घडत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com