ZP Election 2025 : आरक्षणाचं जुनं सूत्र विसरा; झेडपी, पंचायत समितीसाठी आता आरक्षणाचा नवा फॉर्म्युला!

New Reservation Formula : मागील निवडणुकीतील आरक्षणाचा विचार करून लढण्याची तयारी करत असाल फसगत होण्याची शक्यता आहे.
ZP Election 2025
ZP Election 2025Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 24 August : आमचा झेडपी गट किंवा पंचायत समिती गण यापूर्वी अमुक जातीसाठी आरक्षित होता. आता या जातीसाठी आरक्षित होईल, असा अंदाज बांधून निवडणुकीची तयारी करत असाल तर थांबा. यापूर्वी झालेल्या निवडणुकीतील आरक्षणाचा आता संबंध असणार नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकसंख्येचा नवा उतरता क्रम या निवडणुकीसाठी केला जाणार आहे, त्यामुळे मागील निवडणुकीतील आरक्षणाचा विचार करून लढण्याची तयारी करत असाल फसगत होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या यापूर्वी झालेल्या १९९७, २००२, २००७, २०१२ आणि २०१७ मधील निवडणुकीसाठी १९९६ ची नियमावली वापरली जात होती. मात्र, आगामी काही महिन्यांत होणाऱ्या निवडणुकांसाठी ग्रामविकास विभागाने नवी नियमावली तयार केली आहे. झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी (ZP, Panchayat Samiti Election ) नवीन नियमावली तयार झाल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम १९९६ हा रद्द करण्यात आला आहे.

ज्या गटात/गणात २०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती आणि जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असेल अशा जागांपासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने या जागा वाटून दिल्या जाणार आहेत. नव्या उतरत्या क्रमाची ही पहिलीच निवडणूक (Election) असणार आहे. त्यामुळे जी लोकसंख्या अधिक, तेच गट/गण या निवडणुकीसाठी गटात/गणात अनुसूचित जाती/जमातीला राखीव हे निश्‍चित झाले आहे.

नव्याने येणारा हा उतरता क्रम २०२५ पासून नंतर होणाऱ्या सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी वापरला जाणार आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या राखीव जागा आणि यापूर्वी ओबीसीसाठी राखीव न झालेल्या गट/गणातून फिरत्या पद्धतीने ओबीसी आरक्षण काढले जाणार आहे. अनुसूचित जाती, जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी व या प्रवर्गातील महिलांसाठी किती जागा राखीव असाव्यात? याची संख्या राज्य निवडणूक आयोग निश्‍चित करणार आहे.

ZP Election 2025
Satara Politic's : अजितदादांचा साताऱ्यात भाजपला दे धक्का; आमदार भोसलेंचे समर्थक माजी आमदारांचा पुतण्याच फोडला!

आरक्षण प्रक्रियेसाठी नवी नियमावली जाहीर : देशमुख

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी गट व गणाची आरक्षण प्रक्रिया राबविण्यासाठी नवी नियमावली प्रसिद्ध झाली आहे. या नव्या नियमावलीनुसार गट व गणाच्या आरक्षणाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. आरक्षण सोडतीबाबत अद्याप काहीही सूचना आलेल्या नाहीत, या सूचना प्राप्त झाल्यानंतर नव्या नियमानुसार प्रक्रिया केली जाईल, असे उपजिल्हाधिकारी (महसूल) संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले.

अंतिम मतदार यादी अन्‌ आरक्षण सोडतीकडे लक्ष

सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसाठी आणि ११ पंचायत समित्यांच्या १३६ गणांच्या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंतच्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात २४ लाख ८८ हजार २८२ एवढे मतदार आहेत. या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, प्रारूप मतदार यादीवर आक्षेप व हरकती स्वीकारणे, हरकतींवर सुनावणी घेऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.

ZP Election 2025
Solapur DCC Bank : सहकार मंत्र्यांचा सोलापूर ‘डीसीसी’बाबत महत्वपूर्ण निर्णय; वसुली अपिलांवर आता एकत्रित सुनावणी; ‘स्थानिक’च्या तोंडावर वेग?

ही प्रक्रिया राबवीत असताना जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची आरक्षण सोडतही काढली जाणार आहे. निवडणुकीसाठी आवश्‍यक असलेल्या या दोन्ही प्रक्रिया ऑगस्ट अखेर ते सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण केली जाईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com