बीड : ‘‘मी काल रात्रभर झोपलो नाही. कारण मी संवदेनशील आहे. राजकारणात इमोशनलला काही अर्थ नसतो. पण, माझा स्वभाव बदलत नाही. मी रात्रभर (स्व.) गोपीनाथ मुंडे यांचे फोटो पाहत होतो,’’ अशी आठवण आमदार धनंजय मुंडे यांनी सांगितली. (Old memories of Gopinath Munde told by Dhananjay Munde)
भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा आज (ता. ३ मे) नववा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, परळी शहरात लागलेले फोटो आणि सोशल मीडियात व्हायरल होणारे गोपीनाथ मुंडे यांचे व्हिडिओ, त्या सर्वांचा मी साक्षीदार आहे. पण, आमच्या कुटुंबीयांचा वडिलधाऱ्यांचा जो आधार होता, तो गोपीनाथ मुंडे आणि त्यानंतर पंडीतअण्णा मुंडे यांच्या निधनानंतर गेला. आमचे दुसरे दोन चुलतेही वारले. आपला लहान भाऊ मोठा होऊ शकतो, हे स्वप्न पंडीतअण्णा मुंडे यांनी पाहिले.
मी रात्रभर झोपलो नाही. कारण मी संवदेनशील आहे. राजकारणात इमोशनलला काही अर्थ नसतो. पण माझा स्वभाव बदलत नाही. मी रात्रभर गोपीनाथ मुंडे यांचे फोटो आणि व्हिडिओ पाहत होतो. तो फोटो कुठला आहे, असं विचारलं तर मी सांगेन की तो या या गावातील कार्यक्रमाचा आहे. हात वर केलेला जो फोटो आहे, तो कुठल्या रॅलीत अभिवादन करतानाचा आहे, हे मी सोबत असेपर्यंतचे सर्व काही सांगू शकतो, असेही माजी मंत्री मुंडे यांनी नमूद केले.
राज्यात गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भारतीय जनता पक्ष मजबूत झाला आहे. त्यांनी काढलेल्या प्रत्येक रॅलीचा, दिंडीचा मी साक्षीदार आहे. प्रत्येक दौऱ्यात त्यांची मी काळजी घेतलेली आहे, त्यामुळे फोटो, रॅली, सभा कुठली आहे, हे मी सगळं सांगू शकतो, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
मुंडे म्हणाले की, वेगळं झाल्यानंतरसुद्धा काही राजकीय निर्णय घ्यावे लागले. ते निर्णय घेत असतना आणि घेतल्यानंतरसुद्धा आमच्यात संवाद होता. पण, त्यानंतर अशा काही गोष्टी घडल्या की, आमच्यातील संवाद पूर्णपणे संपला. गोपीनाथ मुंडे आणि गोपीनाथअण्णा मुंडे यांचे निधन झाले. त्यानंतर घरातील मोठा म्हणून मला कुटुंबीयांची जबाबदारी घ्यावीच लागली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.