Ajitdada Vs Sanjay Raut : धरणात XXXपेक्षा थुंकणं चांगलं; ज्याचं जळतं, त्याला कळतं; संजय राऊतांचा अजितदादांवर पलटवार

आम्ही भोगूनसुद्धा जमिनीवर उभे आहोत. इकडे तिकडे पळालो नाही. मी माझ्या पक्षाबरेाबर ठामपणे उभा आहे.
Ajit Pawar-Sanjay Raut
Ajit Pawar-Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव घेताच शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत हे थुंकले होते. त्यावरून प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्येक नेत्याने बोलताना तारतम्य बाळगावे, असा सल्ला दिला होता. त्यावर खासदार राऊत यांनी ‘धरणात XXXपेक्षा थुंकणं चांगलं’ असे म्हणत अजितदादांवर पलटवार केला आहे. (Sanjay Raut's bitter criticism of Ajit Pawar, who advises)

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे शुक्रवारी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी राऊत हे श्रीकांत शिंदे यांचे नाव घेताच थुंकले होते. त्यावर राज्याच्या राजकारणात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या मेळाव्यासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. त्या ठिकाणी बोलताना त्यांनी बोलत असताना प्रत्येक नेत्याने तारतम्य, संयम बाळगावा, असे म्हटले होते. त्याला राऊतांनी उत्तर दिले.

Ajit Pawar-Sanjay Raut
BRS Offer to Bhagirath Bhalke : भगीरथ भालकेंना BRSची मोठी ऑफर : पवारांच्या दौऱ्यानंतर आठवडाभरातच राव यांनी साधला संपर्क

राऊत म्हणाले की, बरोबर आहे, धरणात XXXपेक्षा थुंकणं चांगलं. प्रत्येकांनी बोलताना संयम राखला पाहिजे, हे बरोबर आहे. पण, ज्यांच्या जळतं, त्याला कळतं. आम्ही भोगतो आहोत. आम्ही भोगूनसुद्धा जमिनीवर उभे आहोत. इकडे तिकडे पळालो नाही. मी माझ्या पक्षाबरेाबर ठामपणे उभा आहे. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा आणि आमच्यावर संकटं येतात, म्हणून भारतीय जनता पक्षाबरेाबर सूत जुळविण्याचा आमच्या मनात विचार येत नाही.

Ajit Pawar-Sanjay Raut
Baramati Dudh Sangh Election: बारामतीत अजित पवारच ‘दादा’...दूध संघावर पुन्हा फडकावला राष्ट्रवादीचा बिनविरोध झेंडा...

थुंकल्याबद्दल संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी होत आहे. त्याबद्दल राऊत म्हणाले की, या देशातील १३० कोटी लोकांना माफी मागावी लागेल. कारण हे लोक कुठंतरी थुंकत असतात. मी सार्वजनिक ठिकाणी कुठं थुंकलो आहे. माफी मागण्याचा विषय सोडून द्या हो. कसंल काय. मी राजकीय नेत्यांची नावे घेतल्यावर थुंकलो नाही, बेईमानांची नावे घेतल्यावर थुंकलो, हा फरक आहे. ज्यांनी महाराष्ट्राशी, शिवसेनेशी, ठाकरे परिवाराशी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बेईमानी केली, त्यांचं नाव समोर आल्यावर माझी जीभ चावली गेली, त्यानंतर माझ्याकडून ती कृती झाली, असे स्पष्टीकरणही राऊतांनी दिले.

Ajit Pawar-Sanjay Raut
Brij Bhushan Singh News : खासदार ब्रिजभूषण सिंह यांना योगी सरकारचा झटका : घेतला मोठा निर्णय...

त्यांना काय जीवशास्त्र, रसायनशास्त्र,मानसशास्त्र कळतं का. माझ्याइतकं संतुलन चांगलं कुणाचंही नाही. माझ्यामुळे अनेकांचं संतुलन बिघडलं आहे. मला सुरक्षेची गरज नाही. ज्यांनी बेईमानी केली, त्यांना सुरक्षेची गरज आहे. मी वन मॅन आर्मी आहे. मी एकटा लढतो, असेही संजय राऊतांनी सुनावले.

काय म्हणाले होते अजित पवार?

महाराष्ट्रात संस्कृती, परंपरा आपला इतिहास आहे. आपला सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो आणि कसं काम करू शकतो, हे यशवंतराव चव्हाण यांनी संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. पण, संजय राऊत यांची दुसरी बाजू मला ऐकायला मिळाली, त्यात त्यांनी सांगितलं की मला त्रास होत होता, त्यामुळे मी थुंकण्याची कृती केली. माझा त्यामागं तो हेतू नव्हता. त्यामुळे प्रत्येकाने तातरम्य ठेवून बोलावं, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खासदार संजय राऊतांना दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com