
Rahul Gandhi Press on Vote chori : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतचोरी या मुद्द्यावरून केंद्रीय निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार देवराव भोळे हे व्होट चोरी करून निवडून आल्याचा आरोप केला. नवी दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले, 'कर्नाटकमधील आळंद हा एक मतदारसंघ आहे. तिथे कोणीतरी 6018 मतं हटवण्याचा प्रयत्न केला. 2023 च्या निवडणुकीत अळंदमध्ये एकूण किती मतं हटवली गेली हे आम्हाला माहित नाही. पण योगायोगाने कोणीतरी 6018 मतं हटवताना पकडला गेला. याशिवाय महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघातील 6850 मतं वाढवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार केला आहे. यावेळी त्यांनी अनेक पुरावे दाखवले, शिवाय आयोगाला आता सबळ पुरावे दिले आहेत त्यामुळे त्यांनी कारवाई करावी अन्यथा ते मत चोरांना संरक्षण देत आहेत, असं समजू, असंही ते म्हणाले.
राजुरा मतदारसंघात काय घडलं होतं?
राजुरा मतदारसंघात 2024 च्या विधानसभा मतदारसंघात भाजपचे देवराव भोंगळे विरुद्ध काँग्रेसचे सुभाष धोटे अशी लढत झाली होती. यात सुभाष धोटे यांचा अवघ्या 3054 मतांनी पराभव झाला होता. देवराव भोंगळे यांना 72 हजार 882 तर सुभाष धोटे यांना 69 हजार 828 मते मिळाली होती. त्यानंतर आता वर्षभराने राहुल गांधी यांनी या मतदारसंघातील मतदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राहुल गांधींनी स्ट्रॅटेजीच दाखवली :
यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी मतदारयादीतून नावे कशी वगळली जातात, याची माहिती दिली. सॉफ्टवेअर आणि कॉल सेंटरच्या माध्यमातून नावे वगळली असल्याचे त्यांनी सांगितले. कर्नाटकातील मतचोरीचे प्रकरण एका बीएलओच्या मार्फत पकडण्यात आले आहे. त्यांच्या नातेवाईकाचेच नाव वगळण्यात आले होते. बीएलओने याची माहिती घेतली तेव्हा समोर आले की, नातेवाईकाचे मत त्याच्याच शेजाऱ्याने डिलीट केले. त्यांनी शेजाऱ्याकडे विचारणा केल्यानंतर आपण हे केले नसल्याचे त्याने सांगितले. याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर समोर आले की, कोणीतरी तिसऱ्यानेच सेंट्रलाईज माध्यमातून हे काम केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.