राजू शेट्टींच्या मनात चाललंय तरी काय... अजितदादांचे कौतुक करत मुख्यमंत्र्यांना चिमटा!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राजू शेट्टी हे आज (ता. २७ मार्च) बारामतीत एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते.
Ajit Pawar-Raju Shetti
Ajit Pawar-Raju ShettiSarkarnama
Published on
Updated on

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : महाविकास आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने शेट्टी हे सरकारवर नाराज आहेत. पण, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राजू शेट्टी हे आज (ता. २७ मार्च) बारामतीत एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. या वेळी शेट्टींनी अजितदादांचे कौतुक करत मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला. विशेष म्हणजे एफआरपीच्या तुकड्यांबाबत त्यांनी भाष्यही केले नाही, त्यामुळे राजू शेट्टींच्या मनात नेमकं काय चाललंय, अशी चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती. (Raju Shetty praised Deputy Chief Minister Ajit Pawar)

सध्या एफआरपीसह विविध मुद्द्यांवरून राजू शेट्टी यांचे महाविकास आघाडीशी जमेनासे झाले आहे. आपल्याच सरकारवरही ते जोरदार हल्लाबोल करत आहेत. या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील शेतकरी कृती समितीचे सतीश काकडे यांनी अजित पवार आणि राजू शेट्टी या दोघांना काकडे महाविद्यालयात आणि निंबूत (ता. बारामती) एकाच व्यासपीठावर आणले.

Ajit Pawar-Raju Shetti
आता माझी बायकोही म्हणेल आपण नव्यानं लग्न करू : अजितदादांची भरसभेत मिश्किली!

प्रस्ताविकाच्या भाषणात सतीश काकडे म्हणाले की, बारामती तालुका, पुणे जिल्ह्यासाठी अजितदादांच्या सोबत मी राहणार. जीवात जीव असेपर्यंत माझा गट त्यांच्यासोबत राहिल. जिल्हा परिषदेला ते देतील त्याच उमेदवाराचं काम करणार आहे. पण, शेतकऱ्यांबाबत राजू शेट्टी हेच माझे नेते आहेत.

Ajit Pawar-Raju Shetti
प्रचाराच्या धामधुमीत सतेज पाटलांचा झणझणीत कोल्हापुरी मिसळवर ताव!

राजू शेट्टी यांनीही उपमुख्यमंत्री पवारांचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, राज्याचा कारभार तुम्हीच चालवताय. मुख्यमंत्री कधीमधीच आम्हाला दिसतात, या शब्दांत अजितदादांचे कौतुक करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. तसेच, वंचित मुलांना शिक्षण आणि दूध भेसळखोरांना चाप लावा, अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केली. एफआरपीच्या तुकड्यांवरून मात्र व्यासपीठावर चर्चा झडलीच नाही.

Ajit Pawar-Raju Shetti
'शिवसेनेच्या माजी आमदाराने आदित्य ठाकरेंचा आदेश झुगारला'

सुसंस्कृत समारोप करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राजू शेट्टींनी, सतीशरावांनी त्यांच्या त्यांच्या भूमिका मांडल्या. भूमिकांमध्ये भेद असू शकतात. लोकशाहीत विचारस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य आहे. पण, विचार मांडताना समोरच्याचा अपमान, अनादर होणार नाही, अशा शब्दांत भूमिका मांडता आली पाहिजे. मीही पंतप्रधानांसमोर परखड मत व्यक्त केले होते. राज्याची सुसंस्कृतपणाची परंपरा विसरून कुणी कुणी काहीही बोलतात.

Ajit Pawar-Raju Shetti
माजी सरपंचावर कोयत्याने वार; हल्लेखोरास गावकऱ्यांनी पकडले

बिबट सफारी जुन्नर आणि बारामतीतही होणार!

पवारांनी जुन्नरची बिबट सफारी बारामतीला पळवली असा आरोप करत माजी आमदार शरद सोनवणे यांनी उपोषण केले. तर आमदार अतुल बेनके यांनी, बिबट सफारीचा प्रस्ताव अजित पवारांनी मागवला असून सर्वेक्षणही झाले आहे असे म्हटले होते. यानंतरही समाजमाध्यमात बिबट सफारी 'बारामती'ला पळविली अशी चर्चा सुरूच होती. अखेर आज अजित पवार यांनीच 'बिबट सफारी जुन्नरलाही होईल आणि बारामतीलाही होईल' असे जाहीरपणे सांगत वादावर पडदा टाकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com