ठाकरेंनी दिलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरबाबत शिंदे म्हणाले, ‘मी त्याबाबत...’

आमदार फोडण्यासाठी पैशाचा वापर करण्यात आल्याच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. आमच्यापैकी कुठल्याही आमदारास सद्यस्थितीत कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणांची नोटीस नव्हती.
Uddhav Thackeray-Eknath shinde
Uddhav Thackeray-Eknath shindeSarkarnama

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरबाबत मला काहीही माहिती नाही. त्याबाबत आज मी काहीही बोलू इच्छित नाही, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याबाबत मौन बाळगणेच पसंत केले. तसेच, ‘एकनाथ शिंदे (Eknath shinde) हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत,’ या ठाकरेंच्या म्हणण्यावरही ‘मी योग्य वेळी बोलेन’ असे उत्तर शिंदे यांनी दिले. (Regarding Uddhav Thackeray's offer for the Chief Minister's post, Shinde said...)

नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वरील गोष्टी स्पष्ट केल्या. ते म्हणाले की, मी आतापर्यंत अपेक्षा ठेवून कधीच काम केले नाही. आतापर्यंत केलेल्या कामामुळे वेगवेगळ्या संधी मिळाल्या. त्या संधीचे मी शिवसेनेसाठी सोनंचं केले. राज्याचे सर्वोच्च पद मिळाल्याचा आनंद आहे. गेली ३५ ते ४० वर्षे ज्यांनी शिवसेनेत काम केले. तब्बल ४० आमदार बाळासाहेबांचा विचार, विकासाचा अजेंडा, मतदारसंघाच्या विकासाचा निर्णय घेऊन पुढे जातात, तेव्हा हा निर्णय का घेतला, याच्या मुळशी जाण्याची गरज आहे. सत्तेत असूनही आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनुसार विरोधात गेलो. यामध्ये वैयक्तीक कोणाचाही स्वार्थ नव्हता. आम्ही शिवसेना म्हणून ४० लोक एकजुटीचे दर्शन घडवत आहोत. वैचारिक भूमिकेतून आम्ही एकत्र आलो आहेत.

Uddhav Thackeray-Eknath shinde
उद्धव ठाकरे आजही तुमचे नेते आहेत का..? एकनाथ शिंदेंनी दिले हे उत्तर...

आमदार फोडण्यासाठी पैशाचा वापर करण्यात आल्याच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. आम्ही एका वेगळ्या वैचारिक भूमिकेतून एकत्र आलो आहोत. आमच्यापैकी कुठल्याही आमदारास सद्यस्थितीत कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणांची नोटीस नव्हती. कोणीही जबरदस्तीने आलेले नाही. ते परत यावेत, यासाठी खूप प्रयत्न झाले. मात्र कोणीही आपल्या ध्येयापासून ढळले नाहीत. त्यांनी एकजूट कायम ठेवली, अन्याय झाल्याची भावना त्यांच्या मनात होती. मी मुख्यमंत्री बनण्यात या ५० आमदारांच्या एकजुटीचा सिंहाचा वाटा आहे. या ५० आमदारांना विकासनिधी कमी पडणार नाही, याची जबाबदारी मी घेतलेली आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray-Eknath shinde
‘शिवसेनेचे ११ खासदार भाजपच्या संपर्कात’; ‘मातोश्री’वरील बैठकीस तिघांची दांडी

मी मुख्यमंत्री बनण्यात फडणवीसांचा सिंहाचा वाटा!

भाजपकडे अपक्षांसह १२० आमदार असूनही बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून ५० लोक असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आहे. ते सर्वांना डोळ्यात अंजन घालायला लावणारे आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानणार आहे. मला मुख्यमंत्री बनविण्यात फडणवीसांचा सिंहाचा वाटा आहे, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी भाजप व भाजप नेत्यांचे ऋण व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com