Bhagat Singh Koshyari : मंत्रिमंडळ बैठकीत कोश्यारींच्या अभिनंदनाचा ठराव : भाजपने विरोधकांना पुन्हा डिवचले

भाजपचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला.
 Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांची दोन दिवसांपूर्वीच राज्यपालपदावरून (Governor) उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यानंतर आज (ता. १४ फेब्रुवारी) झालेल्या मंत्रिमंडळाच्या (cabinet) बैठकीत कोश्यारी यांचे अभिनंदन करणारा ठराव मांडण्यात आला. हा ठराव मांडून भारतीय जनता पक्षाने (BJP) राज्यातील विरोधी पक्षाला पुन्हा डिवचल्याचे मानले जात आहे. (Resolution to congratulate Bhagat singh Koshyari was presented in the cabinet meeting)

मंत्रिमंडळाची आज साप्ताहीक बैठक होती. त्यात इतर निर्णय घेण्यात आल्यानंतर कोश्यारी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. तो ठराव भाजपचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यात सरकारला मार्गदर्शन केल्याबद्दल राज्यपालांचे अभिनंदन करण्यात आले आहे, असे या वेळी सांगण्यात आले.

 Bhagat Singh Koshyari
BJP MLA's Corruption News : रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार : भाजप आमदार आणि त्यांच्या दोन मुलांना दोन वर्षांची शिक्षा

आपल्या वाद्‌ग्रस्त विधानांनी कालावधी पूर्ण होण्याआधीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवन सोडावे लागले आहे. भगतसिंह कोश्यारी यांची ३१ ऑगस्ट २०१९ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी ५ सप्टेंबर २०१९ रोजी आपल्या पद्‌भार स्वीकारला होता. ते ३ वर्षे पाच महिने राज्यपालपदावर होते. राज्यपालपदाचा कालावधी पूर्ण होण्याआधीच उचलबांगडी होणारे ते महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल ठरले आहेत. ते आपल्या कामापेक्षा वाद्‌ग्रस्त विधानांमुळेच सर्वाधिक चर्चेत राहिले.

 Bhagat Singh Koshyari
Solapur BJP Leader : ‘श्रीकांत देशमुखांनी नांदायला नेले नाही तर आयुष्य संपवणार; मृत्यूला निंबाळकर, चंद्रकांतदादा जबाबदार’

दरम्यान, कोश्यारी जाता जाताच भाजपने पुन्हा एकदा विरोधी पक्षाला डिवचल्याचे मानले जात आहे. कारण गेली अडीच ते तीन वर्षांत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अर्थात महाविकास आघाडीचे नेते विरोधात राज्यपाल असा सामना रंगला होता. राज्यपालांची उचलबांगडी झाल्यानंतर विरोधी पक्षातील बहुतांश नेत्यांनी महाराष्ट्राची सुटका झाली, अशी भावना व्यक्त केली होती. त्यामुळे अभिनंदनाचा ठराव करून भाजपने विरोधी पक्षांना पुन्हा डिवचल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com