सदाभाऊंनी घेतला बिलाचा धसका...? ‘थ्री स्टार’ हॉटेलमध्ये घरगुती शिदोरीवर केली न्याहरी!

पंचायत राज समितीचे सदस्य असलेले सदाभाऊ खोत हे गेली दोन दिवसांपासून सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत.
Sadabhau Khot
Sadabhau KhotSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे सध्या उधारी नाट्यावरून चांगलेच चर्चेत आले आहेत. सोलापुरातील (Solapur) थ्री स्टार हॉटेलमध्ये सदाभाऊंनी आज सकाळी चक्क कार्यकर्त्यांनी घरून आणलेल्या शिदोरीची न्याहरी केली. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि सदाभाऊंनी हॉटेलच्या उधारीच्या बिलाचा इतकी धसका घेतला आहे की काय?, अशी चर्चा रंगली आहे. (Sadabhau had breakfast at Shidori of activists in 'Three Star' Hotel)

पंचायत राज समितीचे सदस्य असलेले सदाभाऊ खोत हे गेली दोन दिवसांपासून सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. काल सांगोल्यात आल्यानंतर त्यांना हॉटेलमालक अशोक शिनगारे यांनी अडवून अगोदर माझे हॉटेलचे थकलेले पैसे द्या आणि त्यानंतरच पुढच्या कार्यक्रमाला जावा, असे सांगितले. अचानक घडलेल्या या घडामोडीमुळे सदाभाऊंनी काय करावे ते कळेना. कशीबशी त्यांनी त्यातून स्वतःची सुटका करून घेतली.

Sadabhau Khot
महादेव जानकारांनी बटाटे वडे तळले अन्‌ राष्ट्रवादीच्या विक्रम काळेंनी हेडलाईन सांगितली...

सदाभाऊ आज पंचायत राज समितीच्या कामानिमित्त सोलापुरात होते. सोलापुरातील थ्री स्टार हॉटेलमध्ये आज सकाळी सदाभाऊंनी कार्यकर्त्यांनी आणलेल्या घरगुती शिदोरीची न्याहरी केली. घरगुती ज्वारीची भाकरी, शेंगा चटणी, हिरव्या मिरचीच्या ठेच्याचा सदाभाऊंनी मनस्वी आस्वाद घेतला. या वेळी त्यांच्यासोबत जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पत्रकारही होते. त्यामुळं सदाभाऊंची थ्री स्टार हॉटेलमधील गावरान न्याहरी आज दिवसभर सोलापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली होती.

Sadabhau Khot
विधान परिषद निवडणुकीत कोणाला मतदान करणार..? रासपचे गुट्टे म्हणाले, जानकरसाहेब...

सांगोल्यात नेमकं काय घडलं होतं?

सदाभाऊ खोत यांनी २०१४ मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी सांगोला तालुक्यातील मांजरी गावचे रहिवाशी  असलेले अशोक शिनगारे यांच्या हॉटेलची उधारी सदाभाऊ यांच्याकडे होती. शेतकरी संघटनेचे माजी पदाधिकारी असल्याचे अशोक शिनगारे यांनी आपल्या उधारीसाठी आक्रमक पवित्रा घेत ‘भाऊ, आधी निवडणुकीतील हॉटेलची उधारी द्या, मग पुढच्या कार्यक्रमाला जावा,’ असे म्हणत राज्यमंत्री खोत यांच्याशी हुज्जत घातली होती. हॉटेलचालक शिनगारे यांनी खोत यांना अडविल्याने पंचायत समिती परिसरात एकच गोंधळ उडाला. त्यात सदाभाऊ खोतांनाही काय बोलावे सुचेना. मात्र, त्यांनी या हाॅटेल मालकाची कशीतरी समजूत काढून स्वतःची सुटका करून घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com