Satyajit Tambe News : नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक वर्षापासून हा मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. यावेळीही येथे काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज न भरता त्याचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला, त्यामुळे डॉ. तांबे यांचे काँग्रेसने (Congress) निलंबन केले.
या मतदार संघात तांबे यांचे वजन आहे. त्यांचा जनसंपर्क आणि मतदार नोंदणीत घेतलेली आघाडी यामुळे त्यांचे पारडे जड आहे. काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली तरी डॉ. तांबे किंवा सुधीर तांबे हे विजयी होतील अशी शक्यता असतानाही, सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. मागील 14 वर्षापासून आमदार असलेल्या डॉ. तांबे यांनी आपल्या मुलासाठी माघार घेत जागा सोडली. मात्र, काँग्रेसकडून लढण्याऐवजी मुलाने अपक्ष अर्ज भरला.
आमदारकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या सत्यजीत तांबे यांनी वडिलांची आमदारकी हिरावली आणि पक्षालाही धोका दिला. काँग्रेसने तांबे यांची उमेदवारी जाहीर केली होती. असे असतानाही पक्षाच्या विचारधारेला तिलांजली देत भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढण्याची तयारी केली. अनेक वर्ष काँग्रेसने घरात आमदारकी दिली. तसेच पक्षाचे युवकचे अध्यक्षपद दिले. मात्र, भाजपच्या प्रेमात आणि एका आमदारकीसाठी सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसचा घात, तर वडिलांचीच आमदारकी हिरावली.
तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचाही विश्वास गमावला आहे. पक्षाने विश्वास ठेवला, पदे दिली मात्र, याच्या बदल्यात सत्यजीत यांनी धोकाच दिला. भाजपच्या (BJP) मांडिवर जाऊन बसण्याची घाई त्यांना इतकी झाली की त्यांनी पक्षाला अंधारत ठेवत, धोका दिला. हे सगळे एका आमदारकीसाठी, असा प्रश्ना आता मतदारांना पडला आहे. अनेक वर्ष काँग्रेसचे निष्ठावान अशी ओळख असेल्या तांबे यांनी पक्षाला धोका दिला. तसेच आपली प्रतिमाही गमावली असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.