Shivsena News : शिवसेना; एक हारली एक जिंकली !

Shivsena and Vidhansabha Election : या निवडणुकीत मात्र शिवसेना (शिंदे गट) जायंट किलर ठरली. शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा संगमनेरमध्ये पराभव केला
Shvisena
ShvisenaSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News: अहिल्यानगर शहरात एकहाती सत्ता मिळविणारी शिवसेना (ठाकरे गट) कधी जिल्ह्यात पोहचलीच नाही. या निवडणुकीत मात्र शिवसेना (शिंदे गट) जायंट किलर ठरली. शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा संगमनेरमध्ये पराभव केला तर नेवासा येथे विठ्ठल लंघे यांनी माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा पराभव केला. या निवडणुकीत एक सेना (शिंदे गट) जिंकली असली तरी दुसऱ्या सेनेला (ठाकरे गट) मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.

शिवसेनेचा (ठाकरे गट) बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यानगर शहरात आमदार संग्राम जगताप यांनी विजयाची हॅट्रीक केली. सलग पाच वेळा आमदार राहिलेले शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांना शह देत जगताप २०१४ मध्ये आमदार झाले. तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने शहरातील शिवसेनेची (Shivsena) पडझड सुरू झाली. या पडझडीत राठोड यांना २०१९ मध्ये दुसऱ्यांंदा पराभवाला सामोरे जावे लागले. कोरोना काळात राठोड यांच्या निधनानंतर तर शहरात शिवसेनेच्या अस्तित्वाचाच प्रश्‍न निर्माण झाला. राठोड यांचा शिवसेनेचा वारसा सांभाळेल, असे एकही नेतृत्व शहरात उभे राहिले नाही.

परिणामी शहरात तग धरून असेलेली शिवसेना खिळखिळी झाली. पक्ष फुटीनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या शिवसेनेने मात्र अल्पावधीत जिल्ह्यात आपले पाय रोवले. त्यामुळेच शिंदे गटाने नेवासा येथून विठ्ठल लंघे, तर संगमनेर येथून अमोल खताळ यांना उमेदवारी दिली. हे दोन्ही उमेदवार जायंट किलर ठरले. दुसरीकडे श्रीगोंदा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांचाही पराभव झाला. येणाऱ्या काळात या दोन्ही सेना आपले अस्तित्व टिकून ठेवणार का? हे वेळेप्रसंगीच स्पष्ट होणार आहे.

Shvisena
Dilip Walse Patil : वळसे पाटलांच्या विजयात 'ट्रम्पेट' चिन्हाचा मोठा वाटा! लाभ झाल्याची कबुलीही दिली

नेतृत्व उभे राहिले नाही -

अहिल्यानगर शहरात सलग २५ वर्षे शिवसेनेची एकहाती सत्ता होती. विधानसभा असो की महानगरपालिका प्रत्येक निवडणूकीत गुलाल शिवसेनेचाच होता. महानगरपालिकेत सातत्याने निवडून येणारे १८ ते २२ नगरसेवक ही शिवसेना व आमदार राठोड यांची ताकद होती. मात्र, कालांतराने आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap यांंच्यासमोर ही ताकद कमी होत गेली. या निवडणुकीत तर राठोड यांची पोकळी भरून काढणारे एकही नेतृत्व शिवसेनेत नव्हते. त्या

Shvisena
Uddhav Thackeray : दारुण पराभवानंतर ठाकरेंनी पुन्हा डरकाळी फोडली; म्हणाले, 'ते फडण'वीस' असले तरी आपण...'

‘दोनाचे चार’ होणार का? -

कधी नव्हे ती शिवसेना या निवडणुकीत जिल्ह्यात पोहचली. दोन मंत्र्यांचा पराभव करत शिंदे सेनेने जिल्ह्यात जोरदार एंन्ट्री केली आहे. त्यामुळे आगामी काळात शिंदे सेनेला आपला विस्तार करण्याची मोठी संधी जिल्‍ह्यात आहे. शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात आहे. त्यामुळे पुढच्या निवडणूकीत सेनेचे ‘दोनाचे चार’ होणार का? हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com