आकांक्षा यादव
Marathi News : राष्ट्रीय पातळीपासून ते राज्यपातळीपर्यंत आपल्याला सगळीकडेच हिंदुत्वाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र राम मंदिराच्या मुद्यांवरून संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. राज्याचा विचार करायला गेले आणि हिंदुत्व म्हटले की, सर्वात आधी नाव येते ते शिवसेनेचे. अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे पक्षाची स्थापना झाल्यापासूनच शिवसेनेत 'हिंदुत्व' हा मुद्दा कायम राहिला आहे.
भाजप आणि शिवसेनेची जोडी ही याच मुद्द्यावरून जमली आणि याच मुद्द्यावरून शिवसेनेत बंडही झाले. बंड झालेल्या नेत्यांनी आम्ही हिंदुत्वासाठी बंड केले, असे कारण सांगत सत्तेत जाऊन सहभागी झालो, असे कारणही दिले. त्यानंतर ठाकरे आणि भाजप असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. याच संघर्षादरम्यान उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आवाज कुणाच्या या कार्यक्रमातून एक विधान केले. त्यामुळे राजकीय पटलावर खळबळ उडाली. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांनी मोदी आणि अमित शाह यांच्यावर केलेल्या एका उपकाराची यावेळी आठवण करून दिली.
उद्धव ठाकरेंच्या या विधानाची दखल प्रत्येक प्रसारमाध्यमाने घेतली. उद्धव ठाकरेंनी मोदींना आठवण करून दिलेले त उपकार कोणता ? बाळासाहेबांनी नेमकं काय केलं होतं? तो किस्सा नेमका काय ? तर २७ जुलै २०२३ रोजी ती आठवण होती बाळासाहेबांनी मोदी आणि शाह यांच्यावर केलेल्या उपकारांची.
सामना आणि शिवसेनेचा कार्यक्रम असलेल्या आवाज कुणाचा या कार्यक्रमात संजय राऊत यांना मुलाखत देताना उद्धव ठाकरेंनी 'काही वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी (Narendra modi ) या दोघांनाही वाचवल्याचं विधान केले. अन त्याचं उपकाराची परतफेड मला याप्रकारे मिळत आहे. जर त्यांना मला संपवायचंच असेल तर तसं ठीक. माझ्यावर माझ्या वडिलांचा आशीर्वाद आहे आणि लोकांचीही मला साथ आहे.
मे २०२२ च्या एका रॅलीमध्ये उद्धव ठाकरे यांनी एक विधान केलं होतं. गुजरातमध्ये झालेल्या दंगलीनंतर 'मोदी हटाओ 'चा नारा सुरु झाला. त्याच काळात लालकृष्ण अडवाणी हे मुंबईमध्ये एका रॅलीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांची भेट घेतली आणि यावर तोडगा मागितला. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी मोदींना हात लावू नका; 'मोदी गया तो गुजरात गया' असं विधान बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा केले होते. २५ फेब्रुवारी २००९ मध्ये सामनामधून स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी यावर अग्रलेख लिहिला होता. या अग्रलेखात बाळासाहेब ठाकरे यांनी याची कबुली दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बाळासाहेब ठाकरे म्हणाले, गोध्रामध्ये दंगली झाल्यानंतर भाजपचा मोदींना हटवण्याचा प्लॅन होता. पण मी स्वतः अडवाणींना म्हणालो; मोदींना हटवू नका 'मोदी गया तो गुजरात गया' २००२ च्या गुजरात दंगलीनंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी गुजरातला भेट दिली होती. याचवेळी त्यांच्या राजधर्मावरील विधानाचीही चर्चा जोरदार झाली. त्यावेळी वाजपेयी यांनी मुख्यमंत्र्यांनी राजधर्माचे पालन करावे, असं विधान केलं होतं. मला विश्वास आहे की, नरेंद्र मोदी हेच करत आहेत. याच उपकाराची आठवण उद्धव ठाकरेंनी (Uddhav thakeray) मोदींना पुन्हा एकदा करून दिली.
'मोदी गया तो गुजरात गया' असे विधान बाळासाहेबांनी ज्यांच्याबाबत केलं होतं ते मोदीनंतर एकदा नव्हे तर दोनदा देशाचे पंतप्रधान झाले. बाळासाहेबांमुळं मोदींचं मुख्यमंत्रिपद जाण्यापासून वाचलं होते. आज बाळासाहेब हयात नाहीत पण तर एकनाथ शिंदेंच्या बंडानंततर वाताहत झालेल्या ठाकरे आणि शिवसेनेच्या नेतेमंडळींकडून या उपकाराची सातत्याने मोदी - शाहांना आठवण करुन दिली जात आहे
(Edited by : Sachin Waghmare)