सोमय्यांनी कितीही बडबड केली तरी `त्या` प्रकरणावर बोलू नका : शिवसेना नेत्यांना संदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेव्हणे पाटणकर यांच्यावर ईडीच्या कारवाईवरून जोरदार संघर्ष
उद्धव आणि आदित्य ठाकरे
उद्धव आणि आदित्य ठाकरेSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेशी संबंधित व्यवहार करणाऱ्या हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याशी ठाकरे कुटुंबाचे आर्थिक व्यवहार असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. असे असले तरी पाटणकर प्रकरणावर न बोलण्याचा सल्ला शिवसेनेच्या नेत्यांना देण्यात आल्याचे समजते.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी काही वर्षांपूर्वी ठाकरे कुटुंबाने एक कंपनी नंदकिशोर चतुर्वेदी यांना विकली होती असे सांगितले. चतुर्वेदी हवालाकिंग म्हणून ओळखले जातात, त्यांच्याशी केवळ मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचेच संबंध नसून ठाकरे यांच्या पत्नी आणि मुलाचेही आर्थिक संबंध असल्याचा आरोप सोमय्यांनी केला. शेल कंपन्यांमार्फत आर्थिक गुंतवणूक करणे हा गंभीर प्रकार ठाकरे कुटुंबामार्फत सुरू ‍आहे. या घोटाळेबाज सरकारविरोधात आपण लढा जारी ठेवू असेही सोमय्या यांनी नमूद केले.

उद्धव आणि आदित्य ठाकरे
महाविकास आघाडीचे फक्त सरकार बोलणारे नाही : मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत घणाघात

न्यायालयात तक्रार

कोरोना रुग्णालयांचे व्यवस्थापन शिवसेना नेते संजय राऊत यांचे भागीदार सुजित पाटकर यांच्याकडे सोपविणाऱ्या कंत्राटाबद्दल सोमय्या यांनी न्यायालयात तक्रार केली आहे. कोरोना साथीच्या काळात सत्तेमुळे मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करत शिवसेनेने चुकीचे उद्योग केले असून ही सर्व माहिती आम्ही जनतेसमोर ठेवू असेही ते म्हणाले.

श्रीधर पाटणकर यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईबद्दल कोणत्याही आमदाराने सभागृहात काही बोलायचे नाही, असे शिवसेनेने ठरवले आहे. महाविकास आघाडी या विषयात भक्कमपणे लढा देण्यास सज्ज आहे. विरोधकांतर्फे मांडल्या गेलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी (ता. २५) उत्तर देणार आहेत. त्या वेळी ते या विषयावर बोलतील असा अंदाज आहे.

उद्धव आणि आदित्य ठाकरे
संजय राऊत भडकले; म्हणाले, राजकीय सूडबुद्धीच्या कारवाईचं उत्तर द्यावं लागेल…

खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर या शिवसेनेतील कुणीही या विषयावर आज वक्तव्य केले नाही. संबंधित प्रकरण जुने आहे, त्याबद्दलची सर्व चौकशी पूर्ण झाली असतानाही ‘ईडी’ने यात पुन्हा लक्ष घालण्याची गरज काय होती, अशी विचारणा आज सत्ताधारी गोटात सुरु होती.

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्यावर वसई विरार परिसरात अवैध संपत्ती जमविल्याचे आरोप शिवसेनेने काही दिवसांपूर्वी केले होते. आर्थिक गुन्हे प्रतिबंधक शाखेतर्फे आज या संदर्भात चौकशी सुरु झाली असून सात व्यक्तींना काही प्रश्न विचारण्यात आल्याचे समजते, मात्र त्यास दुजोरा मिळू शकला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com