CM Naveen Patnaik: अन् ओडिसाच्या मुख्यमंत्र्यांनी थेट वडिलांचे स्मारकचं हटवण्याचे आदेश दिले...

2019 मध्ये स्वर्गद्वार येथील मोक्षधामच्या (स्मशान भूमी) सुशोभिकरणासाठी जागेची कमतरता भासू लागली होती.
CM Naveen Patnaik:
CM Naveen Patnaik:Sarkarnama
Published on
Updated on

Odisa CM Navin Patnaik News: ओडिशाचे विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पुरीच्या विकासासाठी वडील आणि ओडिसाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांची समाधी पाडण्याचे आदेश दिले होते. पटनायक यांच्या अत्यंत जवळचे त्यांचे स्वीय सचिव व्ही.के पांडियन यांनी मंगळवारी दुबईत ओडिया ओडिसी वंशाच्या लोकांशी संवाद साधताना ही माहिती दिली. (The Chief Minister of Odisha directly ordered the removal of the father's memorial)

CM Naveen Patnaik:
Murtijapur APMC : मुर्तिजापुरात भैय्यासाहेबांनी राखली अविरोध निवडीची परंपरा !

तेरा वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्र्यांसोबत असलेले त्यांचे जवळचे स्वीय सचिव व्ही.के पांडियन यांनी मंगळवारी दुबईत ओडिया समुदायाला संबोधित करताना हा खुलासा केला. स्वर्गद्वार येथे आता स्मारकाऐवजी बिजू बाबूंच्या नावाचा फलक आहे. 2019 मध्ये स्वर्गद्वार येथील मोक्षधामच्या (स्मशान भूमी) सुशोभिकरणासाठी आणि येथे येणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी जागेची कमतरता भासू लागली होती. (National News)

याच ठिकाणी ओडिसाचे दिवंगत मुख्यमंत्री बिजू पटनायक यांचे स्मारक होते. स्मारकामुळे मोक्षधामच्या सुशोभिकरणात अडथळा येत असलयाचे लक्षात येताच मुख्यमंत्री पटनायक यांनी न डगमगता वडिलांची समाधी पाडण्याचे आदेश दिले. स्मारकामुळे विकासकामे रखडत असल्याने पटनायक यांनी तात्काळ ते स्मारक हटविण्याचा निर्णय घेतला, बिजू पटनायक हे दगडी स्मारकात नव्हे तर जनतेच्या हृदयात राहतात, असं सांगत त्यांनी हे स्मारक पाडण्याचे आदेश दिले, असेही पांडियन यांनी सांगितलं. (National Politics)

CM Naveen Patnaik:
Pune News : उद्धव ठाकरेंना करायला लावलं जी रे जी..! ; बावनकुळेंकडून नितेश राणेंचं कौतुक..

अनेक हिंदूंना स्वर्गद्वार येथे त्यांच्या प्रियजनांवर अंत्यसंस्कार करायचे असतात. तेथे अंत्यसंस्कार केल्यास मोक्ष प्राप्त होतो, असा लोकांचा समज आहे. पण बिजू पटनायक यांच्या निधनानंतर 17 एप्रिल 1997 रोजी स्थानिक संस्थांनी स्वर्गद्वार येथे त्यांचे स्मारक बांधले. यानंतर स्मशानभूमीचा मोठा परिसर स्मारकाच्या परिसरात आला.पण स्मारकामुळे स्वर्गद्वारच्या भूखंडाचा एक कोपरा अडवला गेल्याचे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी तो काढण्याचा निर्णय घेतला. (Marathi Political news)

पटनायक कुटुंबातील इतर सदस्यांचेही असेच मत होते. त्यांचे वडील दगडी स्मारकात नसून लोकांच्या हृदयात राहतात.पुरीचे स्वर्गद्वार हा राज्यातील पहिला परिवर्तन प्रकल्प होता. लोकांचा रोष टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पहाटेच स्मारक पाडण्याचे आदेश दिल्याचे पांडियन यांनी सांगितले. स्वर्गद्वार समुद्रासमोर एक एकरमध्ये पसरलेला आहे, तर आजूबाजूची जमीन सुमारे 15 एकर आहे. स्वर्गद्वार हे पुरी शहराच्या नैऋत्य टोकाला समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com