16 MLA Disqualification Decision : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षावर निर्णय देऊन आता जवळपास एक महिना झाला आहे. न्यायालयाच्या निकालामध्ये आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमका काय, कधी आणि कोणत्या आधारावर निर्णय घेतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात नार्वेकरांनी एक सूचक विधान केले आहे.
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत बाळासाहेब देसाई यांचा चरित्रग्रंथ 'दौलत' याचा बुधवारी प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष नार्वेकर उपस्थित होते. या वेळी आपल्या भाषणात नार्वेकरांनी लवकरच क्रांतीकारी निर्णय घेणार असल्याचे सांगितले, त्यावरुन काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.
नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार आहेत. त्यामुळे ते क्रांतीकारी कोणता निर्णय घेतात, शेड्यूल 10 च्या वर जाऊन निर्णय घेतात काय? हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो आहे. आणि मला वाटते की यामध्ये शेड्यूल 10 च्या वरच निर्णय घ्यावा लागणार आहे. शेड्यूल 10 च्या वर गेले तर तो निर्णय क्रांतीकारी होऊ शकतो, असे पटोले म्हणाले.
दरम्यान, राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) कार्यक्रमात बोलताना बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा गौरव केला. ज्या-ज्या खात्यात देसाई यांनी काम केले, त्या-त्या खात्यात क्रांतीकारी काम करून त्यांनी निश्चितपणे आपला वेगळा ठसा सर्वांसमोर मांडला. माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची त्यांच्याकडे सोपवलेली जबाबदारी म्हणजे 1977-78 या काळात विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले.
''सातत्याने माझा उल्लेख सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून झाल्यामुळे माझे वय सगळ्यांनाच माहिती झाले असलेल. 77 मध्ये माझा जन्म झाला. त्याच वर्षी बाळासाहेब देसाईंवर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी आली होती. त्यांनी राजकीय आयुष्यात ज्या प्रमाणे क्रांतीकारी निर्णय घेतले, त्यातून बरंचसे शिकून कदाचित मीही लवकरच क्रांतीकारी निर्णय घेईन'' असे नार्वेकर म्हणाले होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.